esakal | हाड्या चिड्या छिव रे छिव..! शेतकऱ्यांचा देशी जुगाड 'लय भारी'  
sakal

बोलून बातमी शोधा

हाड्या चिड्या छिव रे छिव..! शेतकऱ्यांचा देशी जुगाड 'लय भारी'  

रब्बीच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. शेती शिवारात गहू, हरभरा, रब्बी, ज्वारी आणि दादर जोमाने डोलत आहे.

हाड्या चिड्या छिव रे छिव..! शेतकऱ्यांचा देशी जुगाड 'लय भारी'  

sakal_logo
By
जगन्नाथ पाटील

कापडणे : हुर्र हुर्र हुर्रया...हाड्या चिड्या छिव रे... डुम डुम डुमा...पयारे पया...फटक फटाडम फट...ढिशक्याव ढिश...मानवी आवाजासह, टेपवरील गाणे, फटाक्यांचा आवाज आणि बदुंकीचा आवाज आता शेती शिवारात घुमू लागला आहे. रब्बी दादर आणि ज्वारीची वाढ जोमदार झाली आहे. दाणे भरुन पक्व होत आहेत. त्या टिपणार्‍या पक्ष्यांना हुसकावून लावण्यासाठी विविध पारंपारीक युक्त्यांसह आधुनिक युक्त्याही वापरल्या जात आहेत.

आवश्य वाचा- पोलिसांना सांगतो का, आता घे म्हणत चेहऱ्यावर 'सपासप' केले वार

गोफण भिरभिरतेय
खरीप हंगामात सलग तीन महिने पाऊस झाला. नदी-नाले खळखळून वाहिले. लहान-मोठे बंधारे तलाव धरणे प्रकल्प तुडुंब भरले. त्यामुळे विहिरी कूपनलिकांची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढली. परिणामी रब्बीच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. शेती शिवारात गहू, हरभरा, रब्बी, ज्वारी आणि दादर जोमाने डोलत आहे. ज्वारी आणि दादरमध्ये दाणे भरुन पक्व आहेत. ही संधी साधून पक्षी मोठ्या प्रमाणात दाणी टिपण्यासाठी येत आहेत. पक्ष्यांच्या थव्यांना हुसकावून लावण्यासाठी शेतकरी गोफणीचा वापर करीत आहे.

टेप, मोबाईलवर वाजताहेत गाणे
पक्ष्यांच्या थव्यांना हुसकावून लावण्यासाठी आणि मोबाईल टेपवर मोठ्या आवाजात गाणी वाजवली जात आहेत. यामुळे शेती शिवारात मोठ्या प्रमाणात मनोरंजनही होत आहे.

देशी जुगाडची बंदुक 
बहुतांश शेतकरी पक्ष्यांना हुसकावून लावण्यासाठी आधुनिक बंदुकीचा वापर करीत आहे. या बंदुकी साठी पीव्हीसी पाइपचा वापर केलेला आहे त्यातून बंदुकीच्या गोळी बरोबर फटाक्यांचा आवाज ही निघतो. यामुळे पक्षांचे थवे तात्काळ उडून जातात. ही बंदूक देशी जुगाड आहे.

आवर्जून वाचा- चक्क आयुक्तांना मोकाट कुत्र्यांची दिली भेट; कोणी केले असे ? वाचा सविस्तर !

रब्बीचे उत्पादन वाढणार
दरम्यान यावर्षी रब्बी हंगाम जोमात आहे. गहू हरभरा दादर ज्वारीचे उत्पादन विक्रमी निघेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. मात्र अवकाळी पावसाने ही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.  

धुळे

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image