esakal | अवकाळीचा पावसाचा नगाव परिसलाला तडाखा 
sakal

बोलून बातमी शोधा

अवकाळीचा पावसाचा नगाव परिसलाला तडाखा 

शेतकऱ्यांवर वारंवार होणाऱ्या आस्मानी,नैसर्गिक संकटाला मेटाकुटीस आला आहे. शेतकरी त्याला लॉकडाऊन पासुन आजतागायत नुकसाचं सोसावे लागत आहे.

अवकाळीचा पावसाचा नगाव परिसलाला तडाखा 

sakal_logo
By
नितीन पाटील

नगाव : नगावसह परिसरातील ढढांने, तिसगाव, वडेल, रामनगर,धमानी या गावाना रबबी गव्हाच्या पिकाला अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. काल रात्री झालेल्या वादळी पावसाने पिकांचे फार नुकसान झाले आहे;  वादळात काही ठिकाणी मका व गव्हाचे पीक आडवे पडले आहे.

आवर्जून वाचा-नवरा बायकोत रंगलंय जिरावा जिरवीचे राजकाराण; ग्रामपंचायत निवडणुकीत हाय व्होलटेज ड्रामा
 

जिल्ह्यात रब्बी गव्हाचे या पावसाने पिकांचे फार नुकसान झाले .
दोन दिवसांपासून पडत असलेल्या अवकाळी पावसाचा फटका रब्बी पिकांना बसला आहे. सध्या रब्बी यावर्षी पाणी असल्यामुळे गव्हाचे क्षेत्र  मोठ्या प्रमाणावर आहे. तालुक्यांत गव्हाचे सर्वाधिक क्षेत्र आहे. आतापर्यंत गहू, हरभरा, कांदा, मका, ज्वारी, बाजरी, भुईमूंग सह फळपिके यांची वाढ होऊन काढनी साठी तयार होत आहे. उशिरा पेरलेला गहू सोंगणीच्या अवस्थेत आहे. या गव्हाला अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. शेतात उभ्या असलेल्या पिकाला पावसाने झोडपले. हरभरा, ज्वारी, मका या पिकांचे तुलनेने नुकसान झाले आहे. धुळे तालुक्यात कांदा बिजोत्पादन घेण्यात येते. यावर्षी कांदा बियाणे घेतले जाणार आहे. सुदैवाने, अवकाळी पावसात कांदा बियाणे व कांदा पिकाचे नुकसान झाले. 

आवश्य वाचा- मृत्यूची प्रतीक्षा करताय का? जळगावकर संतप्त !

शेतकरी हवालदिल  
शेतकऱ्यांवर वारंवार होणाऱ्या आस्मानी,नैसर्गिक संकटाला मेटाकुटीस आला आहे. शेतकरी त्याला लॉकडाऊन पासुन आजतागायत नुकसाचं सोसावे लागत आहे. कापसालाही मोठा नुकसानीचा फटका सहन करावा लागला होता. अशातच अवकाळी पावसामुळे शेतकरीराजाचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने तत्काळ पचंनामा करुन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरीराजाने केली आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image