
मुळा काढणीचा खर्च निघणेही मुश्कील झाले आहे. आता मुळा उत्पादक मुळ्याच्या शेतीत मेंढ्यांचा वाडा बसविण्यास प्राधान्य देत आहेत.
कापडणे : शेतकरी, शेती उत्पादन आणि नुकसान एके नुकसान हे जणू पाचवीलाच पुजलेले आहे. दोन पैसे अधिकचे येतील, असे वाटू लागत असतानाच भाव पडतात अन् नुकसान स्वीकारण्याशिवाय पर्याय राहात नाही. सध्याही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.
आवर्जून वाचा- पिल्लू विहिरीत पडल्याने मादी बिबट्याने फोडला मातृत्वाचा हंबरडा..आणि सुरू झाले रेस्क्यू !
या वर्षी अधिक आणि मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. पाण्याचे सर्वच स्रोत तुडुंब भरून आहेत. यामुळे धुळे तालुक्यात भाजीपाला उत्पादनात कमालीची वाढ झाली आहे. मुळा, कोथिंबीर आणि मेथीचे रेकॉड ब्रेक उत्पादन होत आहे. परिणामी, मुळा अवघा प्रतिकिलो दोन ते तीन रुपयांनी विक्री होत आहे.
भाव मिळत नाही
धुळे तालुक्यातील मुळा उत्पादक शेतकरी हृदयावर दगड ठेवून मुळा शेतीवर रोटाव्हेटर फिरवित आहेत. भाव नसल्याने मुळा फेकण्याशिवाय पर्याय नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
आवश्य वाचा- ग्रामपंचायत निवडणूक: उमेदवार मिळू नये यासाठी रचले जातायं डावपेच, ते कोणते ? वाचा सविस्तर
मुळा शेतीत मेंढपाळांचा वाडा
मुळा काढणीचा खर्च निघणेही मुश्कील झाले आहे. आता मुळा उत्पादक मुळ्याच्या शेतीत मेंढ्यांचा वाडा बसविण्यास प्राधान्य देत आहेत. त्यानंतर रोटाव्हेटर फिरवून शेती तयार करीत आहेत. त्या शेतात गहू पेरणीस शेतकरी प्राधान्य देत आहेत.
तालुक्यातील कापडणे, धनूर, देवभाने, वडेल, नंदाणे, बोरीस, लामकानी, नेर, कुसुंबा, खेडे, मुकटी, अजंग येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे उत्पादन घेतात; पण हे उत्पादन शेतकऱ्याला परवडत नाही.
-किशोर बोरसे, मुळा उत्पादक शेतकरी, कापडणे
संपादन- भूषण श्रीखंडे