दिल्लीत आंदोलन..आणि शेतकऱ्यावर कोणी टरबूज घेता का टरबूज म्हणण्याची वेळ !

जगन्नाथ पाटील   
Wednesday, 30 December 2020

एक महिन्यापासून टरबूजची मोठ्या प्रमाणात काढणी सुरु आहे. दिल्ली आंदोलना अगोदर प्रती किलो दहा ते पंधराचा भाव मिळत होता.

कापडणे : धुळे जिल्ह्यात फळ बागायतचे प्रमाण वाढले आहे. बाराही महिने विविध फळे निघू लागले आहे. सध्या टरबूजचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. येथील टरबूज दिल्ली, पंजाब व हरीयानामध्ये मोठ्या प्रमाणात निर्यात होत असते.

आवश्य वाचा- दुर्दैवी घटना : जवानाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गावकरी तयारीत; एक फोन आला, दुःखाचा डोंगर कोसळला -
 
गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा फटका टरबूज उत्पादकांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. स्थानिक बाजारात प्रती किलो दोननेही कोणी घ्यायला कोणी तयार नाही. कोणी टरबूज घेता का टरबूज असे म्हणण्याची वेळ आली आहे. 

टरबूजचे उत्पादन दहा वर्षांपूर्वी
उन्हाळ्यात नदी किनारी अथवा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात काढले जात होते. आता बाराही महिने टरबूज निघू लागला आहे. धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात टरबूजचे क्षेत्र वाढले आहे. याचा परीणाम अवाजवी उत्पादन वाढून निर्यातही वाढली आहे. 

दिल्ली आंदोलन इफेक्ट
एक महिन्यापासून टरबूजची मोठ्या प्रमाणात काढणी सुरु आहे. दिल्ली आंदोलना अगोदर प्रती किलो दहा ते पंधराचा भाव मिळत होता. व्यापारी थेट शेती बांधावर जावून टरबूज खरेदी करीत होते. मात्र दिल्लीचे आंदोलन सुरु झाल्यापासून टरबूजची मागणी पुर्णपणे बंद झाली आहे. थेट बांधावर येणारी व्यापारी नाॅट रिचेबल झाले आहेत.

आवर्जून वाचा- देवासारखे धावून आले डॉक्टर ; गरोदर महिलेला वेळेवर उपचार मिळाला म्हणून वाचले प्राण -

आमचे यावर्षी टरबूजचे उत्पादन रेकाॅर्ड ब्रेक निघत आहे. मात्र महिन्यापासून तयार झालेला माल शेतात पडून आहे. लाखोचे नुकसान झाले आहे.

अनिल माळी, युवा फळ बागायतदार, कापडणे 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmer marathi news kapdne dhule delhi farmers movement watermelon not sell