मागणी असूनही..कोणी कोथिंबीर घेता का, कोंथिबीर! म्हणण्याची शेतकऱ्यांवर वेळ  

जगन्नाथ पाटील   
Thursday, 4 March 2021

शेतकरी भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. भाजीपाल्याचे प्रतिकिलो भाव किमान पंधरा ते वीस एवढे असणे गरजेचे आहे.

कापडणे : धुळे तालुक्यात कोथिंबीर आणि टोमॅटोचे उत्पादन मोठ्या प्रमाणात आले आहे. भाव मात्र पूर्णतः उतरले आहेत. लग्नसराईत टोमॅटो आणि कोथिंबिरीची मोठ्या प्रमाणात मागणी असूनही भाव पडल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. गल्लोगल्ली फिरून टोमॅटो-कोथिंबीर घेता का कोणी कोंथिबीर, अशी म्हणण्याची वेळ आली आहे. 

आवर्जून वाचा- जळगावातील १४ व्यापारी संकुलने उद्यापासून बेमुदत बंद 
 

धुळे तालुक्यातील कापडणे, न्याहळोद, नगाव, धमाणे, देवभाने, नंदाणे, बुरझड, बोरीस, लामकानी, नेर, कुसुंबा व आनंदखेड्याच्या पट्ट्यात शेतकरी भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. भाजीपाल्याचे प्रतिकिलो भाव किमान पंधरा ते वीस एवढे असणे गरजेचे आहे. तरच ते परवडतात, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

व्यापारी तुपाशी, तर शेतकरी उपाशी 
सध्या सर्वच भाजीपाल्याचे भाव पंधराच्या आत आहेत. मात्र व्यापारी चाळिशीपार विकत आहेत. त्यांच्या पदरी घसघशीत नफा पडत आहे. तर शेतकऱ्यांकडून प्रतिकिलो पंधराच्या आतच खरेदी होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. शेतकरी भाजीपाला पिकवूनही उपाशी, तर व्यापारी तुपाशी, असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. 
 

 

 

कोथिंबिर अवघी प्रतिकिलो दोन रुपयांनी तर टोमॅटोचे वीस किलोचे कॅरेट साठ रुपयांत विकले जात आहे. हे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. आता शेतकऱ्यांनी पिकविणाऱ्यासह विक्रेतेही झाले पाहिजे. तरच भाजीपाला परवडेल. 
- महेंद्र पाटील, युवा भाजीपाला उत्पादक शेतकरी 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmer marathi news kapdne dhule despite demand coriander about low price farmers worried