वीजप्रवाहाच्या वायरी धरून शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 मे 2018

रावेर - लहान भावाच्या लग्नासाठी पैसे जमत नसल्याने गुलाबवाडी (ता. रावेर) येथील ३२ वर्षीय शेतकऱ्याने वीजप्रवाहाच्या वायरी हातात धरून आत्महत्या केली. याबाबत रावेर पोलिस ठाण्यात अाकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

मृताचे नाव रतिलाल भगू पवार (वय ३२,) असे आहे. त्यांचे चुलतभाऊ लक्ष्मण पवार यांनी सांगितले, की रतिलाल पवार हा त्याच्या लहान भावाच्या लग्नासाठी पैसे जमवित होता. २० मे स हा विवाह असल्याने व पैसे जमत नसल्याने रतिलाल वैतागला. आधीच त्याच्यावर कर्ज आहे. घरातील कर्ता असल्याने त्याने शेत विकण्याचा प्रयत्न केला मात्र कुणीही ते घेतले नाही. उधार ऊसनवारही मिळत नव्हती. आज दुपारी शेतात जाऊन येतो असे सांगून रतिलाल गेला. शेतात गेल्यावर त्याने वीज प्रवाह असलेल्या वायरी हातात धरून जीवनयात्रा संपविली. ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यावर वैद्यकीय अधिकारी डॉ. तायडे यांनी मृत घोषित केले. याबाबत डॉ. तायडे यांनी पोलिसांना माहिती दिली. तपास पाल दूरक्षेत्र चे पोलिस उपनिरीक्षक कैलाससिंग पाटील करीत आहेत. रतीलालच्या पश्‍चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmer suicide electric shock