पपई दराबाबतचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर

Farmers are apset about Low Papaya Rate in Nandurbar
Farmers are apset about Low Papaya Rate in Nandurbar

शहादा : उत्तर भारतात पपईच्या दर जास्त असून त्या मानाने नंदुरबार जिल्ह्यातील पपई व्यापारी हे शेतकऱ्यांच्या माल मातीमोल भावाने खरेदी करत आहेत.त्यामुळे पपई उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी असून पीक परवडेनासे झाले आहे. त्या संदर्भात पपई उत्पादक शेतकऱ्यांनी संघर्ष समिती स्थापन केली असून तहसीलदारांना निवेदन सादर केले आहे.उद्या (ता.२४) बैठक बोलाविली आहे.

पपई दरासंबंधी समन्वय साधण्यासाठी पपई उत्पादक संघर्ष समितीच्या वतीने शहादयाचे तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले आहे.दरासंबंधी तोडगा काढण्यासाठी शेतकरी प्रतिनिधी,व्यापारी ,तालुका कृषी अधिकारी व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव यांची संयुक्त बैठक उद्या (ता.२४) सकाळी अकराला शहरातील बायपास रस्त्यावरील रामदेव बाबा मंदिरात बोलावण्यात आली आहे.तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहवे असे, आवाहन पपई उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने केले आहे.

मागील चार ते पाच वर्षांपासून अत्यल्प पावसामुळे पाण्याची अत्यंत बिकट परिस्थिती आहे. परिणामी बहुतांश बोअरवेल्स व विहिरी आटल्या होत्या. क्वचितच शेतकऱ्यांनी पपईची गेल्या हंगामात लागवड केली. त्यामुळे सहाजिकच पपईचे उत्पादन घटल्यामुळे उत्तर भारतातील दिल्ली, लखनौ,मेरठ, अलिगड, मुजफ्फराबाद ,चंदीगड, जम्मू काश्मीर या बाजारपेठेत पपईची मोठ्या प्रमाणात विक्री होत असते.

उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर मागणी

सध्याच्या परिस्थितीत पपई फळाची मागणी मोठ्या प्रमाणावर असल्याने उत्तर भारतातील बाजारपेठांमध्ये ४० ते ४५ रुपये दराने विक्री होत आहे. परंतु उत्तर भारतातील व्यापारी हे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पावसाळ्यापूर्वी उचल जबरदस्तीने देऊन शेतकऱ्याकडून मनमानी पद्धतीने दर देऊन पपईची तोडणी करत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव न मिळता शेतकऱ्यांची लुबाडणूक व फसवणूक होत आहे. त्यासाठी आज पपई उत्पादक संघर्ष समितीचे भगवान पाटील, जितेंद्र पाटील आदींसह संघर्ष समितीच्या शेतकऱ्यांनी तहसीलदार श्री कुलकर्णी यांची भेट घेऊन समन्वय साधण्याचे आवाहन केले . त्यानुसार उद्या सकाळी अकराला रामदेव बाबा मंदिर शहादा येथे पपई उत्पादक संघर्ष समिती च्या वतीने बैठकीचे आयोजन केले आहे. जास्तीतजास्त पपई उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थित राहवे. असे आवाहन भगवान पाटील यांनी केले आहे.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com