जुलै ते डिसेंबर दरम्यान २२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

शहादा : शहादा तालुक्यातील जुलै ते डिसेंबर २०२० कालावधीत मुदत संपणाऱ्या २२ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी संबंधित ग्रामपंचायतीचा प्रभाग रचना व संबंधित प्रभागातील आरक्षण काढण्याचा कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. ग्रामपंचायतींच्या विशेष सभेत ४ फेब्रुवारीला आरक्षण काढण्यात येणार आहे.

शहादा : शहादा तालुक्यातील जुलै ते डिसेंबर २०२० कालावधीत मुदत संपणाऱ्या २२ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी संबंधित ग्रामपंचायतीचा प्रभाग रचना व संबंधित प्रभागातील आरक्षण काढण्याचा कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. ग्रामपंचायतींच्या विशेष सभेत ४ फेब्रुवारीला आरक्षण काढण्यात येणार आहे.

जुलै ते डिसेंबर दरम्यान मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचना व आरक्षण ठरविण्यासाठी कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. ग्रामपंचायतींच्या विशेष सभेत ४ फेब्रुवारीस आरक्षण काढण्यात येणार आहे. तसेच प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना ७ ते १४ फेब्रुवारी २०२० पर्यंत सादर करता येणार असून २९ फेब्रुवारी २०२० ला हरकती व सूचना सुनावणी करिता उपविभागीय अधिकारी यांच्याकडे हरकती सादर करण्यात येणार आहेत.

आठशे मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण

२९ फेब्रुवारीस उपविभागीय अधिकारी आलेल्या सूचना व हरकतींवर सुनावणी करतील.११ मार्च २०२० ला आलेल्या प्रत्येक हरकती व सूचनांवर सुनावणीनंतर अभिप्रायासह अंतिम निर्णयासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे. १७ मार्च २०२० ला उपविभागीय अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेला प्रस्ताव तपासून जिल्हाधिकारी यांनी प्रभाग रचना व आरक्षणाला अंतिम मान्यता देणे व स्वाक्षरी करणे. २१ मार्च २०२० ला जिल्हाधिकारी यांनी मान्य केलेला प्रभाग रचनेला(नमुना अ मध्ये) व्यापक प्रसिद्धी देणे, अशा पद्धतीच्या निवडणूक कार्यक्रम असणार आहे.

नगरपरिषदाच्या प्रभाग रचना कार्यक्रमाला निवडणूक आयोगाकडून स्थगीती

यासाठी प्रभाग विस्तार अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यात निकिता नायक यांची कुकावल व कोठली त.सा. साठी प्रभाग विस्तार अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. कुऱ्हावद त.सा.साठी आर.टी.पानपाटील, कवठळ ग्रामपंचायतीच्या प्रभाग विस्तार अधिकारी म्हणून एम.व्ही. चकोर तर दोंदवाडा व तोरखेडा ग्रामपंचायतीसाठी एम.बी.चव्हाण,नांदरखेडा व वर्ढे त.श. ग्रामपंचायत श्रीमती बी.बी. सूर्यवंशी यांची, टेंभे त.श.व शेल्टी ग्रामपंचायत अव्वल कारकून पी.एस.मराठे , टेंभे व बामखेडा त.सा.श्री.अहिरे , बामखेडा त.त. व फेस ग्रामपंचायत व्ही.डी.सावळे , पुसनद व सोनवद त.श. ग्रामपंचायत एस.झेड्.देवरे , कानडी त.श.एम .के.पाटील ,मनरद व मोहीदे त.श.बी.ओ.पाटील यांची तर जुबेर पठाण यांची सारंगखेडा ग्रामपंचायतीकरिता प्रभाग विस्ताराधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तसेच डामरखेडा व हिंगणी ग्रामपंचायतीकरिता आर.पी.बच्छाव यांची नेमणूक करण्यात आली आहे.

यामुळे आता पंचायत समिती आणि जि.प.निवडणूकीनंतर शहादा तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींचा आखाडा तापणार आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Elections Of 22 Gram Panchayats will take place in July- December