Nandurbar News : अज्ञात माथेफिरूने कापली केळीची झाडे; पिंप्री येथील शेतकऱ्याचे पाच लाखांचे नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Banana crop

Nandurbar News : अज्ञात माथेफिरूने कापली केळीची झाडे; पिंप्री येथील शेतकऱ्याचे पाच लाखांचे नुकसान

शहादा (जि. नंदुरबार) : पिंप्री (ता. शहादा) येथे अज्ञात व्यक्तींनी केळीची (Banana) सुमारे चारशे ते पाचशे झाडे कापून फेकल्याची घटना उघडकीस आली. यात सुमारे चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाले. (Farmers in Pimpri lost 5 lakhs as banana trees were cut down by an unknown nandurbar news)

पिंप्री (ता. शहादा) येथील उद्धव लिमजी पाटील यांनी आपल्या शेतात केळी पिकाची लागवड केली आहे. महागडे रोपे खरेदी करून खतपाणी घालत मेहनतीने पीक जगविले. श्री. पाटील शेतातील कामे आटोपल्यानंतर सायंकाळी घरी आले.

दुसऱ्या दिवशी सकाळी ते शेतात गेल्यानंतर अंदाजित सुमारे चारशे ते पाचशे केळीची झाडे जमिनीवर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कापून फेकल्याचे निदर्शनास आले. संबंधित शेतकऱ्याचा हातातोंडाशी आलेला घास कोणीतरी हिरावला आहे.

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

यात सुमारे चार ते पाच लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. याबाबत शेतकऱ्यांनी शहादा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, यंदा प्रथमच केळीला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती सुधारत आहे. मात्र अज्ञात व्यक्तीने केळीचे झाडे कापल्याने शेतकऱ्याला मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे.