Nashik News : लॅबधारकांना ‘क्लिनिकल’ परवानगीसाठी प्रयत्न करणार! आमदार दराडे व तांबे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satyajeet Tambe

Nashik News : लॅबधारकांना ‘क्लिनिकल’ परवानगीसाठी प्रयत्न करणार! आमदार दराडे व तांबे

येवला (जि. नाशिक) : लॅबोरेटरी धारकांकडून मोठी सेवा सुरु आहे. कोरोना काळात तर स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी रुग्णांची सेवा केली. राज्यातील डीएमएलटी धारकांना स्वतःची क्लिनिकल लॅब चालविण्यासाठी व स्वतःच्या सहीनिशी अहवाल देण्यासाठी शासनाकडून रीतसर परवानगीची आवश्यकता आहे.

ती मिळवून देण्यासाठी आम्ही शासनस्तरावर ठोस प्रयत्न करू. तसेच, संबंधित मंत्र्यांकडेदेखील पाठपुरावा करू असे आश्‍वासन विधान परिषदेचे आमदार किशोर दराडे व पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी येथे दिले. (Lab owners will try for clinical permission MLA Darade satyajeet Tambe Nashik News)

येथील महात्मा फुले नाट्यगृहात पॅरामेडिकल एज्युकेशन संदर्भात जिल्ह्यातील लॅबोरेटरी धारकांची जिल्हास्तरीय कार्यशाळा झाली. त्यावेळी ते बोलत होते. असोसिएशन ऑफ क्लीनिकल लॅबरोटरी ॲनालिस्ट अँड प्रॅक्टिशनर असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष डॉ. धनंजय डबीर,

पॅरामेडिकल कौन्सिलचे राज्याध्यक्ष उमेश सोनार, येवला डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर क्षत्रिय, मनमाड उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंग साळवे, पोलीस निरीक्षक अनिल भवारी, पोलिस उपनिरीक्षक नितीन खडांगळे, झोनल सेक्रेटरी नितीन साळुंखे, नाशिक जिल्हाध्यक्ष प्रवेश झा, नंदुरबार जिल्हाध्यक्ष अरुण वाघ,

राज्याच्या महिला प्रतिनिधी डॉ. वर्षा झवर, सीएमएलटी प्रतिनिधी बापू ढोमसे, तालुकाध्यक्ष नारायण उशीर, जिल्हा प्रतिनिधी लक्ष्मण काकडे, सामाजिक कार्यकर्ते डॉ. भूषण शिनकर प्रमुख पाहुणे होते. जिल्ह्यातील सुमारे ३५० वर लॅबोरेटरी धारक उपस्थित होते. लॅबोरेटरी धारकांना लॅब चालविण्याची व स्वतःच्या सहीच्या अधिकाराची परवानगी मिळावी,

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

ही मागणी गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असून, त्यासाठी शासनाने परवानगी द्यावी अशी मागणी डॉ. डबीर व डॉ. शिनकर यांनी केली. लॅबोरेटरीज धारकांनी उभे केलेले संघटन कौतुकास्पद असून, या एकोप्यातूनच आपले प्रश्‍न ते नक्कीच सोडवतील, असा आशावाद डॉ. क्षत्रिय यांनी व्यक्त केला.

पॅरा मेडिकल कौन्सिलबाबत श्री. सोनार यांनी सविस्तर माहिती दिली. डॉ. शरद गायकवाड यांनी लॅबोरेटरी निदान, तर डॉ. पार्थ देवगावकर यांनी किडनी आजार व तपासणीबाबत मार्गदर्शन केले. मिंड्रे या उत्पादक कंपनीने या वेळी विविध मशिनरींची माहिती दिली व कार्यशाळेस सहकार्य केले. लॅब चालवत असतानाच पीएच. डी. केलेले डॉ. डबिर,

डॉ. जयश्री गायकवाड, डॉ. समिधा पाटील यांचा सत्कार झाला. डॉ. झवर यांनी सूत्रसंचालन केले. विजया पाटील यांनी आभार मानले. सतीश पांढरे, नंदू पाठक, अनिल शिरसाठ, पवन बडोदे, निलेश निकम, भगवंत बेहेले, महेंद्र वाघचौरे, साताळकर, मनोज शिंदे, अनिल जैन, संदीप लोहकरे, अर्जुन कोटमे, शांताराम शिंदे, नितीन वलटे, नितीन जगताप, ज्ञानेश्‍वर सोमासे, कमरान, प्रवीण बडोदे, महिंद्र आहेर, संभाजी खैरनार, राणी अन्सारी आदी उपस्थित होते.