crop damage
sakal
जळगाव: राज्यात अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सरकारने तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे. तसेच मदतीसाठीचे निकषात देखील बदल करून शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत द्यावी.