Dhule News : शेतकऱ्यांनी मुळ्याच्या पिकात सोडली जनावरे; उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी हताश

सुरत, धुळे व शहादा भाजीपाला बाजारात गेल्या आठ दिवसांपासून मुळ्याचे भाव घसरले आहेत.
Animals abandoned in radish field due to fall in prices.
Animals abandoned in radish field due to fall in prices.esakal
Updated on

Dhule News : सुरत, धुळे व शहादा भाजीपाला बाजारात गेल्या आठ दिवसांपासून मुळ्याचे भाव घसरले आहेत. बाजारात दोन ते सात रुपये प्रतिकिलोने विक्री होत आहे. वाहतूक खर्चच प्रतिकिलो दोनचा आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी मुळा काढणे बंद केला आहे.

काही शेतकऱ्यांनी मुळ्यावर रोटाव्हेटर फिरविले आहे, तर काही ठिकाणी बैलांचे वैरण म्हणून वापर सुरू केला आहे. उभ्या पिक्यात गुरे व शेळ्यामेंढ्या सोडल्या आहेत. उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी हताश झाले आहेत. (Farmers released animals in radish crop due to desperate as cost of production is not going dhule news)

गेल्या आठ दिवसांपासून तापमानाचा पारा वाढत चालला आहे. मुळ्याचे भाव अचानक कमी झाले आहेत. कापडणे, देवभाने, न्याहळोद, कौठळ, नगाव, सोनगीर, धनूर परिसरात दररोज दोन-तीन ट्रक मुळा सुरत व शहादा बाजारात दाखल होत असतो.

आठ दिवसांपूर्वी प्रतिकिलो पंधरा ते वीसचा भाव मिळत होता. आठ दिवसांपासून अवघा दोन ते सात रुपये भाव मिळत आहे. वाहतूक खर्चच प्रतिकिलो दोन रुपये आहे. लावणी, काढणी, बियाणे खर्च वेगळाच आहे. भाव कमी झाल्याने बाजारातच मुळा सोडून शेतकऱ्यांना परत यावे लागले आहे.

Animals abandoned in radish field due to fall in prices.
Dhule Municipality News : 73 कोटी थकबाकी; वसुलीसाठी 54 दिवस बाकी; 31 मार्चअखेर मालमत्ता कर वसुलीचा प्रश्‍न

मुळा वैरण

बऱ्याचशा शेतकऱ्यांनी मुळा काढणी बंद केले आहे. मुळा शेतात रोटाव्हेटर फिरवायला सुरवात केली आहे. जनावरे सोडली आहेत. वैरण म्हणून काढले जात आहे. उत्पादन खर्च न निघाल्याने उत्पादक महेंद्र पाटील, बाबूलाल माळी, संभाजी पाटील, राजेंद्र माळी आदी शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

तापमानातवाढ अन्..!

हिवाळ्यात मुळ्याला मोठी मागणी होती. गेल्या आठ दिवसांपूर्वी चार अंशांवर पारा गेला होता. आता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच तापमानात वाढ झाल्याने मुळ्याची मागणी घटली अन् भावातही मोठी घसरण झाली.

Animals abandoned in radish field due to fall in prices.
Dhule News : आता रोज 400 ठिकाणी ‘क्यूआर कोड’चे पेट्रोलिंग : पोलिस अधीक्षक धिवरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com