जळगाव- ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर केल्याने शेतकऱ्यांना मजूरटंचाईच्या समस्येवर तोडगा काढता येईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्मा प्रकल्पांतर्गत शेतकरी गट स्थापन करून ड्रोनच्या मदतीने फवारणी तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन अनुदानासाठी अर्ज करावा, आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शेतकऱ्यांना उत्पादनवाढीसह शेतीतील विविध अडचणींवर मात करता येऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाकडे वळावे व आधुनिक कृषी साधनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.