
जिल्हा पातळीवर कृषी विभागाकडूनदादर महोत्सवाचे आयोजन करुन विक्री करणे. या पध्दतीने पुढील नियोजन होणार आहे.
कापडणे : पढावद ता.शिंदखेडा परीसर शिवारात 'विकेल ते पिकेल' या संकल्पनेनुसार पाचशे एकरवर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संशोधित फुले रेवती दादर (शाळु, रब्बी ज्वारी) प्रकल्प हाती घेण्याात आला आहे. प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी पूणे कृषी आयुक्तालयचे कृषी उपसंचालक भालेराव आले होते.
आवश्य वाचा- अतिवृष्टीची भरपाई; शेतकऱ्यांना मदतीचा दुसरा हात
त्या अंतर्गत कृषी विभागाच्या आत्मा अंतर्गत बियाणे वाटप करण्यात आले होते. कृषी विभागाच्या धोरणानुसार त्याचे उत्पादन जास्त व चांगल्या प्रतीचे घेऊन, त्यावर कृषी विभागाच्या मदतीने प्रक्रिया केली जाणार आहे. मोठ्या निर्यातदार मार्फत निर्यात करणे. शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी गटामार्फत ब्रँडींग करुन विक्री करणे. जिल्हा पातळीवर कृषी विभागाकडूनदादर महोत्सवाचे आयोजन करुन विक्री करणे. या पध्दतीने पुढील नियोजन होणार आहे.
आवश्य वाचा- साक्री तालुक्यात ६९ हजारांवर लाभार्थ्यांचे आधार लिंकिंग बाकीच
दरम्यान प्रकल्पाची पाहणीसाठी कृषी आयुक्तालय पुणे येथील कृषी उपसंचालक भालेराव आले होते. यावेळी शासकीय कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी संघाचे प्रदेशाध्यक्ष तथा
कृषीभूषण अॅड्. प्रकाश पाटील तालुका कृषी अधिकारी विनय बोरसे, मंडळ कृषी अधिकारी साबडे, पर्यवक्षक पी. बी. पाटील, बी. ए. पाटील, मुळे, आनंद ठाकरे, पंढरीनाथ पवार आदी उपस्थित होते. शरद पाटील व ज्ञानेश्वर पवार यांच्या शेतात पाहणी कार्यक्रम झाला.
संपादन- भूषण श्रीखंडे