esakal | पुण्यातील नोकरीला तरुणाने केले बाय बाय; आणि गावी शेती करून मेहनतीचा वाजविला सातासमुद्रापार डंका  

बोलून बातमी शोधा

पुण्यातील नोकरीला तरुणाने केले बाय बाय; आणि गावी शेती करून मेहनतीचा वाजविला सातासमुद्रापार डंका  }

पुण्यात जवळपास 8 वर्ष नोकरी केल्यानंतर नोकरी सोडून आपली वडिलोपार्जित शेती करण्याचा धाडसी निर्णय त्यांनी. मध्ये घेतला..

पुण्यातील नोकरीला तरुणाने केले बाय बाय; आणि गावी शेती करून मेहनतीचा वाजविला सातासमुद्रापार डंका  
sakal_logo
By
सम्राट महाजन

तळोदा : पुण्यातील नोकरीला बाय बाय करीत वडिलोपार्जित शेती करण्याचा धाडसी निर्णय मोड (ता. तळोदा) येथील उच्चशिक्षित तरुण शेतकरी रुपेश गोविंद पाटील यांनी यशस्वी करुन दाखविला आहे. रुपेश पाटील यांच्या शेतातील केळीला ओमान देशाची पसंती मिळाली आहे. त्यामुळे त्यांच्या मेहनतीचा डंका सातासमुद्रापार वाजला असून यामुळे परिसरातील शेतकऱ्यांकडून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

आवर्जून वाचा- जळगाव जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी आता १५ मार्चपर्यंत  ​
 

मोड (ता. तळोदा) येथील अनेक शेतकरी प्रयोगशील मार्गाने शेती करीत मोठी मजल मारतांना दिसून येत आहेत. अशीच एक मोठी मजल येथील उच्चशिक्षित तरुण शेतकरी रुपेश गोविंद पाटील यांनी मारली आहे. रुपेश पाटील यांनी बीएसी बायोटेक केल्यानंतर एमबीए करीत पुण्याला नोकरीला लागले. पुण्यात जवळपास 8 वर्ष नोकरी केल्यानंतर नोकरी सोडून आपली वडिलोपार्जित शेती करण्याचा धाडसी निर्णय त्यांनी 2014 मध्ये घेतला. आजच्या युगात नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय कोणी घेतला तर त्याला मूर्खात काढण्यात येते कारण आजकाल नोकरी मिळणे दुरापास्त झाले आहे. मात्र रुपेश पाटील यांनी मेहनतीचा व आत्मविश्वासाचा जोरावर आपला निर्णय सार्थ ठरविला आहे.

रुपेश पाटील यांनी सुरुवातीला शेतात ऊस, सोयाबीन या पारंपारिक पिकांसोबतच मिरची, पपई आदी पिकांची लागवड केली. त्यानंतर त्यांनी गेल्या वर्षी मे महिन्यात केळीची लागवड करण्याचा निर्णय घेतला. रुपेश पाटील यांनी आपल्या 5 एकर क्षेत्रात अजित सिड्स कंपनीची ग्रँड नाईन या जातीचे एकूण 5800 रोपांची लागवड केली. लागवडी पासून त्यांनी विशेष लक्ष देत रोपांची देखभाल केली, रोपांची वाढ होण्यासाठी खतांची मात्रा व पाण्याचे योग्य असे नियोजन केले. शेतात रात्री - अपरात्री जात मेहनतीच्या जोरावर त्यांनी केळीची बाग चांगलीच फुलवली. त्यामुळे आज त्यांच्या शेतातील केळीला सातासमुद्रापार ओमान या देशाची पसंती लाभली आहे. पहिल्याच तोडीत 9 टन केळीची कटाई करण्यात आली असून त्यातून 1 लाख 28 हजार उत्पन्न प्राप्त झाले आहे. सद्य परिस्थितीत स्थानिक व्यापाऱ्यांकडून केळीला सरासरी अकराशे ते बाराशे रुपये टन पर्यंत भाव मिळत असल्याचे सांगण्यात येते. परंतु विदेशात जाणाऱ्या त्यांच्या केळीला एका टनामागे 1 हजार 326 रुपयांच्या भाव लाभला आहे. रुपेश पाटील यांना विंटेक्स क्रॉप केअर व कॉन्स्ट्रो केम या कंपनीचे विनायक धाबुगडे, नंदकुमार पाटील, सुजय पाटील व साहिल पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

आवर्जून वाचा- मनपा प्रशासनाच्या विरोधात जळगाव शहरातील सातशे मेडीकल बंद 
 


पुण्यात नोकरी करीत असताना दुसऱ्यांना शेतात अधिक उत्पन्न मिळावे यासाठी काय केले पाहिजे याची माहिती देत होतो.
मग विचार केला हेच ज्ञान वापरुन आपण स्वतःच्या शेतात शेती केली तर आपल्याला फायदा होईल. मग त्यानंतर नोकरी सोडून गावी वडिलोपार्जित शेती करण्याचा धाडसी निर्णय घेतला. आज घेतलेल्या त्या निर्णयावर पूर्ण समाधानी आहे.
- रुपेश पाटील
उच्चशिक्षित शेतकरी, मोड.  

 

संपादन- भूषण श्रीखंडे