Nandurbar News : कोरोनायोद्धा धीरेश वळवी यांचा अनोखा गौरव! अंधश्रद्धा निर्मुलनाचा दिला संदेश

Officials of Sankalp Nirman Foundation honoring Dhiresh Valvi with his family who performed the last rites at the cemetery.
Officials of Sankalp Nirman Foundation honoring Dhiresh Valvi with his family who performed the last rites at the cemetery. esakal
Updated on

Nandurbar News : अमावस्येच्या दिवशी स्मशानभूमीत असणारे धीरेश चंदू वळवी यांचा व परिवाराचा कोरोनायोद्धा म्हणून शाल, पुष्पगुच्छ देऊन संकल्प निर्माण फाउंडेशनतर्फे सत्कार व सन्मान करून गौरविण्यात आले.

त्यांना नंदुरबार पालिकेमध्ये कायमस्वरूपी नोकरी द्यावी, अशी मागणीदेखील करण्यात आला. (felicitation of Corona warrior Dhiresh Valvi at Cemetery nandurbar news)

आजची वर्तमान परिस्थिती पाहता महाराष्ट्रात काही शहरांमध्ये जातीय दंगली घडत आहेत व महिला-मुलींवर अत्याचार करून खून केले जात आहेत. त्यामुळे राज्यात अशांतता पसरली आहे. आजच्या घडीला मृत माणसांपेक्षा जिवंत माणसांचे भय, भीती वाढत आहे.

यामुळेच नागरिकांमध्ये स्मशानभूमी, अमरधामाबद्दल गैरसमज व अंधश्रद्धा कशी दूर होईल या हेतूने नंदुरबार येथील संकल्प निर्माण फाउंडेशनतर्फे शनिवारी (ता. १७) अमावस्या असल्यामुळे रात्री बाराला येथील स्मशानभूमीत राहाणारे धीरेश वळवी यांचा कोरोनायोद्धा म्हणून शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार सन्मान करण्यात आला. या वेळी त्यांच्या परिवाराचाही सत्कार संकल्प निर्माण फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला.

येथील स्मशानभूमीत कित्येक वर्षांपासून रात्रंदिवस समाजसेवेच्या माध्यमातून समाजकार्य करणारे धीरेश वळवी एक अशी व्यक्ती आपल्या परिवरासोबत एकांत जागी असलेल्या स्मशानभूमीत राहून वर्षानुवर्षे हजारो पार्थिवांवर दाहसंस्कार करीत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

कोरोनासारख्या महाभयंकर परिस्थितीत आपल्या परिवाराचा विचार न करता, न घाबरता धाडसाने आपल्या तरुण मुलाला सोबत घेऊन कोरोना पॉझिटिव्ह अनेकांचे आई-वडील, भाऊ-बहीण, मुला-मुलींना अग्निडाग देण्याचे महान असे कार्य या योद्ध्याने केले आहे.

पालिकेकडून अत्यल्प मानधनावर अर्धपोटी उदरनिर्वाह हा परिवार करीत असतो. नंदुरबार पालिकेत धीरेश वळवी यांना कायम करावे, अशी मागणी करत प्रत्येक समाजातील घटकाने आपल्या कुटुंबातील मृत पावलेल्या व्यक्तीच्या इतर संस्कारांवर हजारो रुपये खर्च करण्यापेक्षा या गरीब कुटुंबाला काही मदत होईल या अनुषंगाने आर्थिक स्वरूपाचे दान करावे, असे आवाहन संकल्प निर्माण फाउंडेशनतर्फे करण्यात आले.

संकल्प निर्माण फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील महिरे, सचिव नंदू बैसाने, भाऊराव बिरारे, बिरजू बैसाणे, शंकर निकाळजे, पावभा महिरे, दिलीप खैरनार, राहुल ढोढरे, बंटी सोनवणे, शुभम महिरे, अमोल गिरासे, सागर सोनवणे, पवनराज महिरे, निसर्ग महिरे, अदिती बैसाणे आदि उपस्थित होते.

Officials of Sankalp Nirman Foundation honoring Dhiresh Valvi with his family who performed the last rites at the cemetery.
Women Driver News : तिच्या हाती एसटीचे स्टिअरिंग..! आदिवासी जिल्ह्यातील त्या बनल्या पहिल्या महिला चालक...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com