Women Driver News : तिच्या हाती एसटीचे स्टिअरिंग..! आदिवासी जिल्ह्यातील त्या बनल्या पहिल्या महिला चालक...

pallavi beldar become first female st bus driver from tribal district nandurbar news
pallavi beldar become first female st bus driver from tribal district nandurbar newsesakal
Updated on

Nandurbar Women Driver News : नेहमी सांगितले जाते हे काम महिलांचे नाही, ते काम महिलांचे नाही; परंतु संधी मिळाल्यास संधीचे सोने करत आम्हीही कोणत्याही क्षेत्रात मागे नाही हे अनेक क्षेत्रांत उत्तुंग भरारी घेऊन काम करणाऱ्या महिलांनी दाखवून दिले आहे.

अंगी जिद्द व चिकाटी कायम ठेवत संघर्ष करून शहादा येथील राज्य परिवहन महामंडळाच्या आगारात पल्लवी बेलदार या आदिवासी जिल्ह्यातील पहिल्या महिला चालक म्हणून नुकत्याच रुजू झाल्या. (pallavi beldar become first female st bus driver from tribal district nandurbar news)

येथील पल्लवी एकनाथ बेलदार यांचा घरची आर्थिक परिस्थिती बेताची. वडील एका दुकानात कामावर. परिणामी उच्च शिक्षण न घेता डीएड करून उज्ज्वल पिढी घडविण्याचा मानस मनात ठेवला; परंतु नोकरभरती नसल्याने नोकरी मिळाली नाही. तरीही जिद्द व चिकाटी न सोडता ड्रायव्हिंगची आवड असल्याने प्रशिक्षण घेतले.

पल्लवीच्या भावाचा २०१७ मध्ये मृत्यू झाला. मोठ्या बहिणीचे लग्न झाले. त्यामुळे घराची जबाबदारी पल्लवीवर आली. २०१९ मध्ये चालकाचे प्रशिक्षण घेत असतानाच कोरोनामध्ये वडिलांचा मृत्यू झाला.

आता काय करावे, असा मोठा प्रश्न पल्लवीसमोर उभा ठाकला होता. आईचा सांभाळ, घराची जबाबदारी अन् एसटी महामंडळातील चालकाचे ट्रेनिंग अशा तिहेरी संकटांना जिद्दीने लीलया पेलत तिने औरंगाबाद येथे आपले चालकाचे प्रशिक्षण पूर्ण केले आणि आता शहादा आगारात जिल्ह्यातील पहिली महिला चालक म्हणून काम करीत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

pallavi beldar become first female st bus driver from tribal district nandurbar news
Success Story: मुस्लिम देशातील हिंदू अब्जाधीश, भारतातील एका गरीब शेतकऱ्याचा मुलगा ते कोट्यवधींच्या कंपनीचा मालक

असा झाला खडतर प्रवास...

२०१९ मध्येच धुळे विभागात एसटी बसचालकपदाचा अर्ज केला; परंतु मध्ये कोरोना काळ आल्याने २०२० मध्ये प्रशिक्षण सुरू झाले. मध्येच संप आला. संपाच्या कालावधीत वडील एकनाथ बेलदार यांचे निधन झाले. त्यामुळे खचल्यासारखे वाटले. घरात फक्त आईच असल्याने तीच आधारस्तंभ झाली.

जिद्द आणि चिकाटीच्या बळावर प्रशिक्षण पूर्ण केले. औरंगाबाद येथे प्रशिक्षण घेत असताना पैशांचा आधारही नव्हता. त्यातच मोठी बहीण व तिचा पती यांनी खूप मोठा आधार दिला. २०२२ मध्ये अंतिम परीक्षा झाली. त्यात पल्लवी उत्तीर्ण झाली. त्यानंतर ८० दिवसांचे सेवापूर्व प्रक्षिक्षण पूर्ण केले. आता चालक म्हणून शहादा आगारात नियुक्ती झाली.

pallavi beldar become first female st bus driver from tribal district nandurbar news
Success Story: 'या' एका कारणावरून सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली लाखोंची नोकरी, आज आहे आध्यात्मिक गुरु

"प्रशिक्षण सुरू असताना वडील वारल्याने खूप दुःख झाले. मोठा आधारस्तंभ कोसळला; परंतु जिद्द अन् चिकाटीने प्रशिक्षण पूर्ण केले आणि चालकपदी नियुक्ती झाली. मुलींनीही कुठलीही भीती न बाळगता जिद्दीने कोणतेही कार्य केल्यास यशोशिखर गाठता येते."-पल्लवी बेलदार, महिला चालक

"माझी पल्लवी आज चालक झाली. मला तिचा खूप अभिमान आहे, गर्व आहे. मला दोन मुले व दोन मुली आहेत. पैकी एका मुलाचे दुर्दैवी निधन झाले. दुसरा इंजिनिअर आहे. एक मुलगी विवाहित असून, दुसरी मुलगी पल्लवी आहे. पतीचे कोरोनात निधन झाल्यानंतर सध्या तिच्याच सहारा मला आहे." -मंगलाबाई एकनाथ बेलदा, आई

pallavi beldar become first female st bus driver from tribal district nandurbar news
Success Story : कठोर परिश्रमातून महिलेने फुलवली नैसर्गिक शेती; वर्षाकाठी कमावतात ७ ते८ लाख रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com