कजगाव येथे किराणा सुपर मॉलला भीषण आग

प्रमोद पवार
शुक्रवार, 23 मार्च 2018

आज दि. 23 ला मध्यरात्री दिड ते दोन वाजेच्या सुमारास किराणा दुकानाला अचानक भीषण आग लागल्याने संपूर्ण जळून खाक झाले.

कजगाव (ता. भडगाव) - येथील रेल्वे स्टेशन रोडवरील महाराष्ट्र सुपरशॉप या नावाच्या किराणा दुकानाला अचानक भीषण आग लागल्याने संपूर्ण जळून खाक झाले. आज दि. 23 ला मध्यरात्री दिड ते दोन वाजेच्या सुमारास घडली. या आगीत सुमारे 70 ते 80 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

याबाबत माहिती अशी येथील व्यापारी रशीदशेख बागवान यांचा मुलगा सादिक बागवान यांच्या मालकीचे येथील स्टेशन रोड रस्तालगत महाराष्ट्र सुपर शॉप नावाने किराणा तसेच संसार उपयोगी विक्रीचा मॉल असून या मॉल दि. 23 ला मध्यरात्री दिड दोनच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळेमुळे अचानक आग लागली. ही आग एवढी भीषण होती कि एक ते दोन तासात दुकानातील संपूर्ण फर्निचरसह किराणा व इतक साहीत्य जळून खाक झाले. दरम्यान ही आग आटोक्यात आणण्यासाठी चाळीसगाव, भडगाव, पाचोरा येथील अग्निशमन केंद्रांची बंबच्या सहाय्याने विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु आगीच्या भीषणतेत सगळे खाक झाले होते. या अचानक लागलेल्या आगीत दुकानातील सुमारे 70 ते 80 लाखांचा माल नुकसान झाल्याचा अंदाज आहे. याबाबत घटनेबाबत भडगाव पोलिस स्टेशन मध्ये आकस्मिक नोंद करण्यात आली आहे.

घटनास्थळी तहसिलदार यांची भेट -
या घटनेची माहिती मिळताच भडगाव तहसिलदार सी. एम. वाघ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली यावेळी तलाठी यांना घटनेचा पंचनामा करून अहवाल सादर करण्याचे सुचना केली.

Web Title: Fierce fire to the Kirana Super Mall in Kajgaon