प्रतापराव पाटील यांच्या संस्थेच्या वतीने केरळ पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदत

सुधाकर पाटील
शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018

भडगाव : कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील यांचा 62 वाढदिवस उत्साहात साजरा झाला. तर वाढदिवसानिमित्त संस्थेच्या वतीने केरळ राज्यातील पुरग्रस्तांसाठी 'सकाळ रिलीफ फंडा'च्या माध्यमाने 1 लाख 11 हजार 111 रूपयांची मदत दिली.

भडगाव : कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील यांचा 62 वाढदिवस उत्साहात साजरा झाला. तर वाढदिवसानिमित्त संस्थेच्या वतीने केरळ राज्यातील पुरग्रस्तांसाठी 'सकाळ रिलीफ फंडा'च्या माध्यमाने 1 लाख 11 हजार 111 रूपयांची मदत दिली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याच्या बांधकाम विभागाचे अप्पर सचिव प्रशांत पाटील होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार किशोर पाटील, 'सकाळ'चे निवासी संपादक राहुल रनाळकर, माजी नगराध्यक्ष शामकांत भोसले, जिल्हा दुध संघाच्या संचालिका डाॅ. पूनम पाटील, स्थानिक स्कूल कमिटी चेअरमन सुभाष पाटील, विनायक पाटील, संस्थेचे संचालक डॉ.कमलेश भोसले, श्रीमती जिजाबाई शिसोदे, रंजनाताई पाटील, नगरसेविका योजना पाटील, कोकीळा पाटील, कुसूमताई पाटील,  पी.सी.धनगर, सेनेचे उपजिल्हाप्रमुख गणेश परदेशी, सेनेचे शहरप्रमुख मनोहर चौधरी उपस्थितीत होते.

किसान शिक्षण संस्थेचे चेअरमन किंवा शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष प्रतापराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील व्यक्तीनी त्यांना शुभेच्छा दिल्या. संस्थेच्या वतीने केक कापुन त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

वाढदिवसानिमित्त आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत संस्थेच्या वतीने विजेत्यांना रोख बक्षीस, स्मृतीचिन्ह, तसेच परी स्पोर्ट्स गॅलरीतर्फे स्मृतीचिन्ह देण्यात आले. तर प्रत्येक सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. यावेळी आमदार किशोर पाटील, अप्पर सचिव प्रशांत पाटील व 'सकाळ'चे निवासी संपादक राहूल रनाळकर यांनी यावेळी मनोगत व्यक्त करत प्रतापराव पाटीलांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक लाडकुबाई विद्यालयाच्या प्राचार्या वैशाली पाटील यांनी केले. यावेळी भारत मुक्ती मोर्चाचे विजय अडकमोल,जाकीर कुरेशी,विक्रम सोनवणे,अंबादास सोमवंशी (बाळद), माधवराव पाटील(अंतुर्ली), सु.गि.पाटील विद्यालयाचे प्राचार्य अरुण पाटील, अशोक परदेशी, सुधाकर पाटील, संजय पवार, सुनील पाटील, सुनिल कासार, धनराज पाटील, राजु शेख,  संभाजी पाटील, विठ्ठल पाटील, शिवाजी पाटील,रमेश पाटील (सावदे), माजी पंचायत समिती सदस्य  हिरामण पाटोळे (पिंप्रीहाट), किरण नाईक, प्रशांत बडगुजर, डॉ.विलास देशमुख, जी.जे.पाटील राजेंद्र पाटील, किशोर पाटील, एन.के.भोसले, डी.टी.भोसले(आमडदे), रावसाहेब पाटील (कोठली), जगन्नाथ पाटील(वलवाडी), युवराज पाटील(वडजी), लक्ष्मण पाटील(महिंदळे), बिपीन पाटील(पिंपरखेड), ग.स.सोसायटीचे अध्यक्ष विलास नेरकर, सुभाष चौधरी (माणकी), अशोक पाटील(भातखंडे,), एस.एस.केदार यांनी वाढदिवसानिमित्त प्रतापराव पाटील यांचा सत्कार केला.

कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्राचार्या वैशाली पाटील (भडगाव), लाडकुबाई प्राथमिक चे मुख्याध्यापक कमलेश शिंदे, आर.ए.पाटील(कोळगाव), ए.बी.पाटील (गिरड), रविंद्र वळखंडे(आमडदे), विलास पाटील(आमडदे), एस.पी.माळी (प्राचार्य डी.टी.एड),अरुण बागुल(महिंदळे), अभिजीत शिसोदे(पळासखेडे), व्ही.झेड.पाटील (अंजनविहीरे), जी.जे.पाटील(भातखंडे), आर.एस.मोराणकर (वडजी), श्री. जाधव (अंतुर्ली), राणी पाटील (भडगाव), संदीप देसले(कोळगाव), सौ.मृणाल धनगर (गिरड) यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी  मेहनत घेतली.

सूत्रसंचालन दीपक भोसले, प्रशांत पाटील, उपप्राचार्य डी. डी.पाटील यांनी तर  डी .डी. भोसले (गिरड) यांनी आभार मानले. दरम्यान, माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे, आमदार डाॅ. सतिश पाटील, डाॅ. सुधीर तांबे, माजी आमदार चिमणराव पाटील, दिलीप वाघ यांनी भ्रमणध्वनीवरून प्रतापराव पाटीलांना शुभेच्छा दिल्या.  

केरळ पूरग्रस्तांसाठी 1 लाख 11 हजारांची मदत

दरम्यान, किसान शिक्षण संस्थेच्या वतीने चेअरमन प्रतापराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त केरळ पुरग्रस्तांसाठी 'सकाळ रिलीफ फंडा'च्या माध्यमाने 1 लाख 11 हजार 111 रूपयांचा धनादेश 'सकाळ'चे निवासी संपादक राहूल रनाळकर यांच्याकडे आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीत सुपुर्द करण्यात आला.

यावेळी आमदार किशोर पाटील यांनी यानिर्णयाचे कौतुक केले. राहुल रनाळकर यांनी प्रतापराव पाटील यांच्या जागल्याच्या भुमिकेचे कौतुक केले. तर त्यांची मदतीची भुमिका इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगत सकाळ रिलीफ फंडाला निधी दिल्याबद्दल आभार मानले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Financial Help to Flood Affected Peoples