धुळे- जिल्ह्याची मुख्य बाजारपेठ असलेल्या येथील जुन्या आग्रा रोडवरील पाचकंदील परिसरात सोमवारी (ता. ३) पहाटे साडेचारच्या सुमारास मार्केटमध्ये आग लागली. तिच्या तांडवात पाच दुकाने खाक झाली. त्यामुळे व्यावसायिकांना लाखो रुपयांचा फटका सहन करावा लागला. शॉटसर्किने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असला, तरी पाचकंदील परिसरातील जीर्ण मार्केट पाडून महापालिकेतर्फे ना नवे संकुल साकारले जात, ना प्रभावी उपायोजना राबविल्या जात. त्यामुळे पुन्हा आगीचे तांडव पाहण्याचे दुर्भाग्य या भागाच्या नशिबी आल्याचेच खेदाने म्हणावे लागेल.