Nandurbar News : स्वातंत्र्याच्या 77 वर्षांनंतर गावाने चक्क प्रथमच पाहिली बस..!

For first time after 77 years of independence ST bus service was started for remote village of horafali nandurbar news
For first time after 77 years of independence ST bus service was started for remote village of horafali nandurbar newsesakal

वाण्याविहीर (जि. नंदुरबार) : स्वातंत्र्याच्या ७७ वर्षांनंतर प्रथमच अतिदुर्गम भागातील होराफळी गावासाठी एसटी बससेवा (Bus Service) सुरू करण्यात आली.

बससेवा सुरू करण्यासाठी आमदार आमशा पाडवी यांनी पाठपुरावा केला होता. (For first time after 77 years of independence ST bus service was started for remote village of horafali nandurbar news)

स्वातंत्र्याच्या ७७ वर्षांनंतरही अक्कलकुवा तालुक्यातील अनेक गावांना जोडणारे रस्ते उपलब्ध नाहीत. त्यामुळे अनेक गावांना दळणवळणाच्या सोयी सुविधा उपलब्ध नाहीत. होराफळी येथे ये-जा करण्यासाठी रस्ता आहे, मात्र तेथे जाण्यासाठी बससेवा उपलब्ध नव्हती.

त्यामुळे खापर व तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करून किंवा जीवघेण्या अवैध वाहतुकीचा आधार घ्यावा लागत असे. त्यामुळे आर्थिक भुर्दंडासह जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत होता म्हणून या परिसरातील ग्रामस्थांची अनेक महिन्यांपासून बससेवा सुरू करण्याची मागणी होती. मात्र याकडे संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष होत होते.

परिसरातील ग्रामस्थांनी आमदार पाडवी यांना बससेवा सुरू करण्यासाठी विनंती केली होती. त्या अनुषंगाने आमदार पाडवी यांनी नुकतेच अक्कलकुवा आगारात रुजू झालेले व्यवस्थापक संजय कुलकर्णी यांना बस सुरू करण्यासंदर्भात सांगितले. त्यानुसार श्री. कुलकर्णी यांनी तातडीने अनुकूलता दर्शविली व आवश्यक ती कार्यवाही करून बससेवा सुरू केली. अक्कलकुवा ते होराफळी बससेवेचा प्रारंभ आमदार पाडवी यांनी श्रीफळ वाढवून केला.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

For first time after 77 years of independence ST bus service was started for remote village of horafali nandurbar news
NMC News : मायको सर्कल, त्रिमूर्ती चौक उड्डाणपुलासाठी आर्थिक तरतूद

या वेळी नंदुरबार जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, समाजकल्याण सभापती शंकर पाडवी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख विद्या साळी, अक्कलकुवा आगाराचे नूतन आगारप्रमुख संजय कुलकर्णी, अक्कलकुवा ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच उषाबाई बोरा, उपसरपंच इम्रान मक्रानी, सरपंच, ज्येष्ठ नेते

पृथ्वीसिंग पाडवी, कान्हा नाईक, रवी चौधरी, युवासेनेचे जिल्हा समन्वयक रोहित चौधरी, शहरप्रमुख रावेंद्रसिंह चंदेल, तालुका उपप्रमुख तुकाराम वळवी, किशोर ठाकूर, राजू पवार, माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य अमरसिंग वसावे, दीपक पाडवी, गोलू चंदेल, युवानेते कुणाल जैन, स्वप्नील जैन, शाकिब पठाण, राजू पाटील, सुनीता पाडवी,

भिकमचंद चव्हाण, अश्विन सोनार, भटू बोरा यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, अक्कलकुवा आगारातील लेखाधिकारी बाजीराव वसावे, लिपिक नंदकिशोर बोंद्रे, वाहन परीक्षक गणेश मराठे, वाहतूक नियत्रंक एम. डी. खैरनार वाहक, जे. एल. पावरा, चालक डी. एस. पावरा, चालक रामू वसावे, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

For first time after 77 years of independence ST bus service was started for remote village of horafali nandurbar news
Nashik News : श्रीराम, गरुड रथाची डागडुजी सुरू; रास्ते आखाडा तालीम संघाकडून तयारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com