Dhule News : धुळे पोलीस मुख्यालयात साडेचार कोटींची कामे; रस्ते, प्रवेशद्वारासह शहीद स्मारक सुशोभीकरण

शहरातील पोलिस मुख्यालयातील शहीद स्मारकासह अंतर्गत रस्त्यांची कामे, प्रवेशद्वार आदी कामांचे आमदार फारूक शाह यांच्या हस्ते गुरुवारी (ता. ४) भूमिपूजन झाले.
Farooq Shah laying the groundwork for the Martyr Memorial at Police Headquarters.
Farooq Shah laying the groundwork for the Martyr Memorial at Police Headquarters.esakal

Dhule News : शहरातील पोलिस मुख्यालयातील शहीद स्मारकासह अंतर्गत रस्त्यांची कामे, प्रवेशद्वार आदी कामांचे आमदार फारूक शाह यांच्या हस्ते गुरुवारी (ता. ४) भूमिपूजन झाले.

इतर प्रशासनिक सेवांवरील भांडवली खर्च व राज्य पोलिस गृहनिर्माणसाठी बांधकाम करणे याअंतर्गत सुमारे चार कोटी ४१ लाखांच्या निधीतून ही कामे मार्गी लागतील. (Four half crore works in Dhule police headquarters Beautification of Martyrs Memorial with roads entrance News )

निवृत्त पोलिस निरीक्षक देवीदास चौधरी अध्यक्षस्थानी होते. पोलिस मुख्यालय प्रवेशद्वार बांधणे तसेच पोलिस मुख्यालय कवायत मैदान बैठक व्यवस्थेचे बांधकाम, मैदानात ध्वजस्तंभ उभारणे व त्याचे बांधकाम करणे.

पोलिस मुख्यालय परिसरात शहीद स्मारकाच्या सुशोभीकरणासह लँडस्केप बगीचा आवार भिंतीचे बांधकाम करणे तसेच पोलिस मुख्यालयातील मल्टिपर्पज हॉलचे नूतनीकरण करणे, परिसरातील अंतर्गत रस्त्यांची सुधारणा करणे आदी कामांसाठी हा निधी खर्ची पडेल.

शासनाने दिला निधी

पोलिस मित्रांनी आमदार शाह यांच्याकडे निवेदनाद्वारे विविध कामांची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर तत्काळ दखल घेत शासनासह गृह विभागाकडे पाठपुराव्यातून आमदारांनी निधी मिळवून आणला.

जिल्ह्यातील पोलिस बांधवांसाठी स्वतःचे घर असावे यासाठी आमदार शाह यांनी प्रस्ताव सादर केला आहे. त्यास लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. याबद्दल जिल्हा पोलिस कर्मचारी, पोलिस बॉईजने आमदार शाह यांचे आभार मानले.

Farooq Shah laying the groundwork for the Martyr Memorial at Police Headquarters.
Dhule News : भाजप, शिवसेना ठाकरे गट हॉकर्सच्या पाठीशी

कार्यकारी अभियंता आर. आर. पाटील, उपअभियंता धर्मेंद्र झाल्टे, निवृत्त पोलिस असोसिएशनचे अध्यक्ष नासिर पठाण, बॉबी वाघ, रऊफ पठाण, सलीम शाह, नगरसेवक नासीर पठाण, सईद बेग, नगरसेवक अब्दुल गणी डॉलर, डॉ. दीपश्री नाईक, मौलवी शकील, निजाम सय्यद, कैसर अहमद, आसिफ शाह.

प्यारेलाल पिंजारी, छोटू मच्छीवाले, हालीम शमसुद्दीन, इब्राहिम शेख, नजर पठाण, नुरा शेख, अकिब अली, समीर मिर्झा, शहजाद मन्सुरी, फातिमा अन्सारी, मलेखा खाटीक, सुलेमान मलिक, रफिक शाह, परवेज शाह, मुजाहिद शेख, नाहींद शेख, फैसल अन्सारी आदी उपस्थित होते.

Farooq Shah laying the groundwork for the Martyr Memorial at Police Headquarters.
Dhule Municipality News : निर्धारित जागेकडे हॉकर्स फिरकले नाहीत; महापालिकेची कसोटी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com