नाशिक जिल्ह्यात आगीमुळे सिलिंडरचा स्फोट; चौघांचा होरपळून मृत्यू

प्रमोद पवार
बुधवार, 20 फेब्रुवारी 2019

या स्फोटात मुरलीधर हरी चौधरी (वय ३२), कविता मुरलीधर चौधरी (वय 30), तुषार मुरलीधर चौधरी (वय १०) आणि नयन कैलास चौधरी (वय ८ ) अशी मयतांची नावे आहेत. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.

नाशिक : धाऊर (ता. दिंडोरी) येथे गॅस सिलिंडरच्या भीषण स्फोटात दोन मुलांसह पती पत्नीचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री ही घटना घडली. चौधरी कुटुंब झोपेत असताना पेटलेल्या दिव्यामुळे जवळच्या बारदानाला आग लागली. त्यानंतर  आग सिलिंडरजवळ पोहचली. रेग्युलेटर सुरू असल्याने मोठा स्फोट झाला. त्यात 2 मुलांसह पती, पत्नीचा होरपळून मृत्यू झाला.

या स्फोटात मुरलीधर हरी चौधरी (वय ३२), कविता मुरलीधर चौधरी (वय 30), तुषार मुरलीधर चौधरी (वय १०) आणि नयन कैलास चौधरी (वय ८ ) अशी मयतांची नावे आहेत. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.

Web Title: four people burn in fire at Nashik

टॅग्स