Nandurbar News : शहरात 31 पर्यंत रुग्णांची मोफत तपासणी; छत्रपती मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा निर्णय

health checkup
health checkupesakal

Nandurbar News : आधीच दुष्काळी परिस्थिती अन् आता अवकाळीच्या संकटात शेतकरी कुटुंबे पिचलेली आहेत. त्यातच वातावरणीय बदलामुळे साथीच्या आजारांनी डोके वर काढल्याने दुहेरी संकट नागरिकांवर कोसळत आहे.

सामाजिक बांधिलकीतून छत्रपती मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ३१ डिसेंबरपर्यंत रुग्णांची जनरल मोफत तपासणी करण्यात येणार आहे.(Free examination of up to 31 patients at chhatrapati multispecialit hospital nandurbar news)

शासनाने नंदुरबार तालुका दुष्काळी जाहीर केलेला आहे. कमी पर्जन्यमानामुळे शेत पिकले नसल्यामुळे यंदा बळीराजा आर्थिक संकटात ओढवला गेलेला आहे. त्यातल्या त्यात अनेक शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. घरातील कर्ता पुरुष गेल्याने परिवारावर अस्मानी संकट कोसळले.

त्यातल्या त्यात वातावरणीय बदलामुळे साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. अशा परिस्थितीत छत्रपती मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलने समाजहितार्थ विधायक निर्णय घेतला असून, २ ते ३१ डिसेंबरपर्यंत सकाळी दहा ते दुपारी एक, सायंकाळी पाच ते आठपर्यंत हॉस्पिटलमध्ये तपासणी करण्यात येईल.

संधीचा लाभ घेण्याचे आवाहन शिवसेनेचे नेते, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, उद्योजक मनोज रघुवंशी, शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी व हॉस्पिटल व्यवस्थापनाने केले आहे.

health checkup
Nandurbar News : जिल्ह्यात 4 शाळांमध्ये देशातील पहिले अनोखे ग्रहांचे मॉडेल!

रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा

नंदुरबार शहरासह तालुक्यात साथीचे आजार सध्या फैलावलेले आहेत. दोन दिवसांपूर्वीच रनाळे येथे डेंगीचे रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली होती. लहानांपासून वृद्धांपर्यंत अनेक जण रुग्णालयात उपचार घेत आहेत.

आधीच दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे कुटुंबाची आर्थिक गणिते बिघडलेली आहेत. अशा परिस्थितीत रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून छत्रपती मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत तपासणी करण्यात येणार आहे.

health checkup
Nandurbar News : जिल्हा नियोजनच्या 432 कोटी 85 लाखांच्या प्रारूप आराखड्यास मान्यता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com