Nandurbar News : जिल्ह्यात 4 शाळांमध्ये देशातील पहिले अनोखे ग्रहांचे मॉडेल!

The unique planetary model commissioned in the Zilla Parishad school in the district, while in the second photo, Education Officer Satish Chaudhary, Prafulla Rangari, Lalita Bhamre, Advt. Yogini Khanolkar etc.
The unique planetary model commissioned in the Zilla Parishad school in the district, while in the second photo, Education Officer Satish Chaudhary, Prafulla Rangari, Lalita Bhamre, Advt. Yogini Khanolkar etc.esakal
Updated on

Nandurbar News : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानामार्फत जिल्ह्यातील चार शाळांमध्ये देशातील पहिले अनोखे ग्रहांचे मॉडेल बसविण्यात आले, तसेच कृतिशील विज्ञान केंद्र विकसित करण्यात आले आहे. या विज्ञान केंद्राचा नर्मदानगर येथे लोकार्पण सोहळा पार पडला.(Country first unique planetary model in 4 schools in district nandurbar news)

नर्मदानगर जिल्हा परिषद शाळेत कृती संगमातून उभारण्यात आलेल्या शालेय पोषणबागेचे उद्‍घाटन प्रकल्पाचे राज्य मिशन मॅनेजर प्रफुल्ल रंगारी यांच्या हस्ते झाले. त्यानंतर शाळेचे अडगळीत पडलेले सामान निर्लेखन करून वापरात नसलेल्या खोलीला मुलांच्या खेळघरात रूपांतरित झालेल्या आनंदघरचे उद्‍घाटन जिल्हा शिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांच्या हस्ते झाले.

त्यानंतर जिल्हा परिषद शिक्षण सभापती गणेश पराडके यांच्या हस्ते सांस्कृतिक कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेल्या बिरसा मुंडा रंगमंचाचे उद्‍घाटन करण्यात आले.डिसेंबर २०१७ पासून नंदुरबार जिल्ह्यातील निवडक ग्रामपंचायतींमध्ये महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे काम सुरू झाले. राजाराम दिघे अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी असून, अभियानाचे काम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत सुरू आहे.

अभियानाच्या आदर्श शाळा विकसित करण्याच्या दुसऱ्या टप्प्यात, नंदुरबार जिल्ह्यातील चार जिल्हा परिषद शाळांची निवड करण्यात आली. दुर्गम भागातील डोंगरात चालणाऱ्या धडगाव येथील काल्लेखेतपाडा (उमराणी) जिल्हा परिषद शाळेची माहिती श्री. उप्पीन यांनी दिली व अभियानाचे आभार मानले.

तळोदा तालुक्यातील विस्थापित आदिवासी समूहाचे पुनर्वसन झालेल्या वसाहतीतील जिल्हा परिषद शाळा, नर्मदानगर, अक्कलकुवा तालुक्यातील ऊर्दू माध्यमाची शाळा छोटी राजमोही येथे झालेल्या कामांचा आढावा मुजम्मिल हुसैन मोहम्मद सलीम या शिक्षकांनी सादर केला. शहादा तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर गरीब, शेतमजूर असलेल्या नांदे गावातील जिल्हा परिषद शाळेत झालेल्या कामांची मांडणी मुख्याध्यापक शिंदे यांनी दिली.

The unique planetary model commissioned in the Zilla Parishad school in the district, while in the second photo, Education Officer Satish Chaudhary, Prafulla Rangari, Lalita Bhamre, Advt. Yogini Khanolkar etc.
Nandurbar News : पशुधनाच्या वंध्यत्वाची तपासणी करून घ्यावी; जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांचे आवाहन

नर्मदानगर येथील जिल्हा परिषद शाळेच्या कामाची सविस्तर मांडणी मुख्याध्यापक घटी यांनी केली. अभियानांतर्गत झालेल्या कामाच्या अहवालाचे प्रकाशन उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते झाले. या वेळी अक्कलकुवा केंद्रप्रमुख ललिता भामरे, जिल्हा शिक्षणाधिकारी सतीश चौधरी, अभियानाचे मिशन मॅनेजर प्रफुल्ल रंगारी यांनी मनोगत व्यक्त करून अभियानाच्या कार्याचे कौतुक केले. शिक्षण सभापती गणेश पराडके यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य होते ते शाळेत देण्यात आलेल्या अनोख्या ग्रहांच्या मॉडेलचे लोकार्पण. हे देशातील पहिलेच असे मॉडेल आहे जे यानिमित्ताने चार तालुक्यांच्या चार प्रातिनिधिक शाळांना देण्यात आले आहे.

या उपक्रमांतर्गत विज्ञानातील विविध संकल्पना स्पष्ट करणाऱ्या ३० प्रकारच्या प्रतिकृती आणि मुलांना प्रयोग करण्यासाठी ३० प्रकारचे प्रयोग संच देण्यात आले आहेत. चौथी ते सातवी-आठवीपर्यंतच्या वर्गांचा विचार करून मुलांना हाताळायला सोप्या असतील अशा प्रतिकृतीच दिल्या गेल्या आहेत.

The unique planetary model commissioned in the Zilla Parishad school in the district, while in the second photo, Education Officer Satish Chaudhary, Prafulla Rangari, Lalita Bhamre, Advt. Yogini Khanolkar etc.
Nandurbar News : प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 12 बलुतेदारांसाठी नवसंजीवनी : संजय गाते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com