Dhule : विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तके

Books for Distribution
Books for Distributionesakal

शिंदखेडा (जि. धुळे) : समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत (Samagra Shiksha Abhiyan) यावर्षी शिंदखेडा तालुक्यातील ३३० शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्य पुस्तके (Free textbooks) मिळणार आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने (ZP Education department) पाठ्यपुस्तकांची मागणी केली होती. या मागणीनुसार पुस्तकांचा पुरवठा झाला असून शिक्षण विभागातर्फे तालुक्यातील सर्व शाळेंना पाठ्यपुस्तकाचे वितरण झाले असून, पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळणार आहेत. (Free textbooks for students on the first day of schools at shindkheda Dhule news)

वर्ग एक ते आठ विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत मोफत पाठ्यपुस्तके वितरित करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा परिषद ,नगरपालिका, अनुदानित शाळा ,शासकीय, अंशतः अनुदानित शाळा या शाळेतील विद्यार्थ्यांना सदर योजनेचा लाभ देण्यात येतो. २०२२-२३ सत्राकारिता तालुक्यातील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या मागवण्यात आली होती. त्यानुसार ३५ हजार ३६५ पुस्तकांचे संच सर्व शाळांना वितरित करण्यात आले. यात विद्यार्थ्यांचे ओझे कमी करण्यासाठी पायलट प्रोजेक्ट अंतर्गत एक ते सात या वर्गासाठी एकूण २५ हजार ४४३ एकात्मिक पाठ्यपुस्तके व सेमी इंग्लिश साठी एकूण अकरा हजार ८२२ पाठ्यपुस्तके चा समावेश आहे. शाळा १५ तारखेपासून शाळा सुरू होणार असून बुधवार पासून शाळा गजबजणार आहेत.

Books for Distribution
नंदुरबार : जिल्ह्यात पावसाची हजेरी

शाळापूर्व तयारीचा दुसरा मेळावा १५ जूनला सर्व शाळेमध्ये घेण्यात येईल. याअंतर्गत आलेल्या विद्यार्थ्यांचे वाजंत्री च्या तालावर गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात येणार असल्याचे गटशिक्षणाधिकारी डॉ. सी. के. पाटील आणि गट समन्वयक सी. जी. बोरसे यांनी सांगितले.

Books for Distribution
धुळे : डंपरखाली चिरडून तरुण ठार; मुलगी जखमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com