जळगाव: महाराष्ट्र बांधकाम कामगार मंडळाद्वारे नोंदणीकृत कामगारांना शासनातर्फे मोफत भांडीवाटप योजनेचा पुरता फज्जा उडाला आहे. चिंचोली (ता. जळगाव) गावात तब्बल पाच तास कामगार रोजगार बुडवून अन्न-पाण्याविना ताटकळत राहिले, तरी प्रशासनाचा कोणीच जबाबदार अधिकारी या ठिकाणी फिरकला नाही.