Dhule Crime : शेतातून 6 लाखांचा गांजा जप्त

Crime News
Crime Newsesakal

Dhule News : नटवाडे (ता. शिरपूर) येथील भुईमुगाच्या शेतात जोपासलेली गांजाची झाडे शहर पोलिसांनी उपटून काढली. २ मेस सायंकाळी केलेल्या या कारवाईत दोन क्विंटलपेक्षा अधिक गांजा जप्त करण्यात आला. (From farm in Natwade Shirpur Ganja worth 6 lakh seized dhule crime news)

शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक ए. एस. आगरकर यांना नटवाडे येथे गांजाची लागवड केल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी शोधपथकासह कारवाईसाठी नटवाडे येथे धाव घेतली. सुळे फाट्यापासून काही अंतरावर असलेल्या भुईमुगाच्या शेतात आणि बांधावर गांजाची झाडे आढळून आली. पोलिसांनी ती उपटून काढली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Crime News
Dhule Crime News : गुंगीकारक औषधांच्या अडीचशे बॉटल्स जप्त; आझाद नगर पोलिसांची कारवाई

त्यांचे वजन दोन क्विंटल ९१ किलो ३० ग्रॅम भरले. बाजारभावानुसार या मुद्देमालाची एकूण किंमत पाच लाख ८२ हजार रुपये आहे. शेतमालक हरचंद जोगी पावरा (रा. नटवाडे) याच्याविरोधात गांजाची लागवड केल्याच्या संशयावरून गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक ए. एस. आगरकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस ठाण्याच्या शोधपथकाने ही कारवाई केली.

Crime News
Crime News : पत्नीला मॅसेज का करतो असा जाब विचारल्याने ; एकाला मारहाण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com