अर्थसंकल्पातून धुळ्याला निधी मिळावा; आमदार फारुक शाहांचे अर्थमंत्रीना दिले निवेदन 

निखील सूर्यवंशी
Wednesday, 10 February 2021

शहरातील आग्रा रोडवर वाहतुकीची कोंडी होते. त्यात शेकडो हातगाडीधारक, पथारी व्यावसायिकांची भर पडली आहे.

धुळे ः महापालिका क्षेत्रात वाहतुकीसह अनेकविध समस्या ऐरणीवर आहेत. त्यामुळे काही ठिकाणी उड्डाणपुलांची आवश्‍यकता भासत आहे. त्यासह आरोग्य सेवेचे बळकटीकरण, महापालिकेचे उत्पन्न वाढीसाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या येत्या अर्थसंकल्पातून धुळे शहराला भरीव निधी द्यावा, अशी मागणी आमदार फारूक शाह यांनी निवेदनाव्दारे केली. 

आवर्जून वाचा- चिंताजनक : जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे पून्हा रुग्ण संख्या वाढू लागली
 

नाशिक येथे विभागीय महसूल कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा वार्षिक योजनेसाठी राज्यस्तरीय बैठक झाली. त्यावेळी आमदार शाह यांनी विविध मागण्या केल्या. त्या अशा ः 

उड्डाणपुलाची मागणी 
शहरातील आग्रा रोडवर वाहतुकीची कोंडी होते. त्यात शेकडो हातगाडीधारक, पथारी व्यावसायिकांची भर पडली आहे. ही कोंडी फोडण्यासाठी आग्रा रोडवर मनोहर थिएटरपासून ते कराचीवाला खुंटापर्यंत उड्डाणपूल होण्यासाठी भरीव निधीची तरतूद व्हावी. नवीन हद्दीत पिण्याच्या पाण्यासाठी जलवाहिनी, गटारी, रस्ते, पथदिव्यांसाठी वीस कोटींच्या निधीची तरतूद करावी. शहरालगत महामार्गांवरून रोज पंधरा हजारांवर वाहने धावतात. यात मोहाडी परिसरात महापालिकेतर्फे दोन हेक्टर ६० आर म्हणजेच सरासरी सव्वासात एकर जागेवर ट्रक टर्मिनलसाठी प्रस्ताव आहे. पैकी खासगी ०.६७ हेक्टर जागा संपादीत करावी लागेल. ही जागा ट्रान्सपोर्ट हब म्हणून विकसीत झाल्यावर महापालिकेला उत्पन्न मिळून शहरात विकास कामे वाढतील. त्यासाठी निधी द्यावा. 

 

आवर्जून वाचा- काटकोन आकारात वसले गाव पाहून जयंत पाटलांना पडले आश्चर्य; आणि जाणून घेतला ऐतिहासीक वारसा ! 

आरोग्य सेवेचा प्रश्‍न 
शहरात मध्यवर्ती भागात जुने जिल्हा शासकीय रुग्णालय (सिव्हील) आहे. तेथे प्रसूतिगृह सुरू झालेले नाही. शंभर खाटांचे जिल्हा रुग्णालय कार्यान्वित होण्यासाठी वेतनावर डॉक्टर, कर्मचाऱ्यांची नियुक्ती आहे. रुग्णालय सकाळी आठ ते दुपारी एकपर्यंत सुरू राहते. ते पूर्ण वेळ सुरू राहावे आणि ३५० खाटांच्या सुविधेचे केले तर गरीब, सामान्यांना दिलासा मिळेल, याकडे आमदार शाह यांनी मंत्र्यांचे लक्ष वेधले. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fund marathi news dhule mla faruk shaha finance minister budget demand fund dhule