Dhule News : जिल्हा रुग्णालयातील इमारतीस दीड कोटी : खासदार डॉ. सुभाष भामरे

District Government Hospital
dhule
District Government Hospital dhuleesakal

Dhule News : येथील सुरत बायपासवरील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जिल्हा सर्वोपचार रुग्णालयाचे शवविच्छेदनगृह अत्याधुनिक होणार आहे. याकामी खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या पाठपुराव्याअंती इमारत बांधकामासाठी एक कोटी ५५ लाख १५ हजार ४२५ रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांचे खासदार डॉ. भामरे यांनी आभार मानले. (fund of 1 5 crore for building of district hospital is approved dhule news)

धुळे जिल्ह्यासह सीमेलगतच्या नंदुरबार, जळगाव, नाशिक जिल्ह्यातील अनेक गावांसाठी हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचे जिल्हा सर्वोपचार रुग्णालय वरदान ठरते. रुग्णांना वैद्यकीय सुविधा, उपचार पुरविण्यासाठी हिरे महाविद्यालयासह रुग्णालय महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते. रुग्णालयाच्या विविध सोयी-सुविधांमध्ये वाढ करून सर्वसामान्य जनतेला चांगले उपचार मिळावेत, आधुनिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्नशील असल्याचे खासदार डॉ. भामरे यांनी सांगितले.

निधीची मागणी मंजूर

जिल्हा रुग्णालयाच्या शवविच्छेदनगृह इमारतीच्या श्रेणीवर्धन बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी हिरे वैद्यकीय महाविद्यालय व्यवस्थापनाने केली. त्यानुसार खासदार डॉ. भामरे यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला. त्यांनी पालकमंत्र्यांसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देत निधी उपलब्धतेची मागणी केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

District Government Hospital
dhule
Dhule News : वडिलांच्या स्मरणार्थ रुग्णांना अद्ययावत बेड; म्हसदीच्या देवरे कुटुंबीयांचा सामाजिक उपक्रम

तसेच वेळोवेळी भेट घेत पाठपुरावाही केला. त्यास यश मिळून राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारने भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्न जिल्हा सर्वोपचार रुग्णालयाच्या शवविच्छेदनगृह इमारतीच्या आधुनिकीकरण आणि बांधकामासाठी एक कोटी ५५ लाखांवर निधी दिला आहे.

तसे पत्र हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास प्राप्त झाले आहे. यात अत्याधुनिक पद्धतीने शवविच्छेदनगृह तयार केले जाईल. याकामी शासनातर्फे लवकर निविदाप्रक्रिया राबविली जाईल, असे खासदार डॉ. भामरे यांनी सांगितले.

District Government Hospital
dhule
Dhule Highway News : जनतेनेदेखील विषय लावून धरण्याची आवश्यकता; लोकप्रतिनिधी, प्रशासनाने लक्ष देण्याची गरज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com