जळगाव: शहरातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनासाठी महापालिकेने निर्माल्य संकलन हा उपक्रम हाती घेतला आहे. गणेश मंडळांमधून पूजेनंतर उरलेले निर्माल्य संकलित करून त्यापासून सेंद्रिय खत तयार केले जाईल. यासाठी विशेष पाच रथ महापालिकेच्या आरोग्य विभागाने तयार केले आहेत.