Dhule Crime News : प्रवासी भासवून लुटणारी टोळी जेरबंद; टोळीत महिलेचेही सहभाग

The police arrested the gang that was robbing the motorists along with the goods and weapons.
The police arrested the gang that was robbing the motorists along with the goods and weapons. esakal

धुळे : मुंबई-आग्रा महामार्गावर प्रवासी असल्याचे भासवून वाहनांना हात दाखवून वाहनचालकांना लुटणाऱ्या टोळीचा आझादनगर पोलिसांनी पर्दाफाश केला. बुधवारी (ता. ३०) पहाटे महामार्गावर आयशरचालकाची लूट करून पसार झालेल्या दरोडेखोरांच्या सात जणांच्या टोळीला पोलिसांनी गजाआड केले. विशेष म्हणजे या टोळीत एका महिलेचाही समावेश आहे. दरम्यान, या टोळीकडून पोलिसांनी घातक शस्त्रे, दुचाकीसह दीड लाखाचा ऐवज हस्तगत केला. (Gang of impersonating travelers jailed Women also participate in gang Dhule Latest Crime News)

औरंगाबाद येथून औषधी माल घेऊन इंदूर (मध्य प्रदेश)कडे जाणारा आयशर ट्रक बुधवारी (ता. ३०) पहाटे साडेतीनच्या सुमारास शहरातील मुंबई-आग्रा महामार्गावरील वरखेडी उड्डाणपुलाखाली सर्व्हिस रोडवरून जात असताना एका महिलेने प्रवासी असल्याचे भासवून आयशरला हात दाखविला असता चालकाने गाडी थांबविली. गाडी थांबवताच अंधारात लपलेल्या तिच्या साथीदारांनी आयशरसह चालकाला गराडा घातला. चाकू, लोखंडी पाइप, लाकडी दांडके आणि मिरचीपूड डोळ्यात टाकण्याचा धाक दाखवून चालकाला मारहाण केली, त्याचे हातपायदेखील बांधले.

चालकासह सहचालकाकडून आठ हजार ६०० रुपयांची रोकड व २३ हजारांचे दोन मोबाईल टोळीने हिसकावून घेतले. दरम्यान, सहचालकाने दरोडेखोरांच्या तावडीतून निसटून तेथून पळ काढला. रस्त्यात त्याला पोलिसांच्या गस्तीपथकाची गाडी दिसली. गस्तीपथकाने त्याची विचारपूस केली असता त्याने आपबीती सांगितली. गस्तीपथकाचे शकील शेख आणि चालक घुगे तत्काळ घटनास्थळी पोचले. मात्र तोपर्यंत दरोडेखोर पसार झाले. श्री. शेख यांनी घटनेची माहिती आझादनगर पोलिसांना दिल्यानंतर संदीप कढरे, शोएब शेख, सुशील शेंडे, अतिक शेख, सिद्धार्थ मोरे घटनास्थळी पोचले. त्यांनी दरोडेखोरांचा शोध सुरू केला.

हेही वाचा : आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

The police arrested the gang that was robbing the motorists along with the goods and weapons.
Nashik Crime News : ग्रामीणमध्ये 321 अवैध धंद्यांवर कारवाई; 370 संशयितांविरोधात गुन्हे दाखल

घटनास्थळापासून थोड्याच अंतरावर पोलिसांना एक महिला लक्झरी गाडीला हात दाखविना दिसली. तिची चौकशी केली असता तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांचा संशय बळावल्यानंतर तिच्यावर त्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. यातून तिने आयशरचालकांना लुटल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी तिच्या साथीदारांचा शोध घेत सहा दरोडेखोरांना जेरबंद केले. इतर चार ते पाच संशयितांचा शोध सुरू आहे. या दरोडा प्रकरणी आयशरचालक ताहीरखान रियाज खान (रा. बलखड, ता. कसरावत, जि. खरगोन, मध्य प्रदेश) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आझादनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, विभागीय पोलिस अधिकारी प्रदीप मैराळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आझादनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील, दीपक पावरा, लक्ष्मी करनकाळ, शकील शेख, प्रकाश माळी, आरिफ सय्यद, राजेंद्र ढिसवे, योगेश शिंदे, संदीप कढरे, संतोष घुगे, शोएब बेग, आतीफ शेख, एस. एन. मोरे, एस. पी. शेंडे यांच्या पथकाने कारवाई केली.

The police arrested the gang that was robbing the motorists along with the goods and weapons.
Nashik News : पहिला ‘कश्’ अन्‌ नशेचा तो थ्रील; मौजमजेसाठी तरुणाई व्यसनाच्या आहारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com