Latest Marathi News | पहिला ‘कश्’ अन्‌ नशेचा तो थ्रील; मौजमजेसाठी तरुणाई व्यसनाच्या आहारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Smoking

Nashik News : पहिला ‘कश्’ अन्‌ नशेचा तो थ्रील; मौजमजेसाठी तरुणाई व्यसनाच्या आहारी

नाशिक : टपरीवर दोन मित्र... एक स्मोकर, दुसरा चहा पिणारा... पहिला सिगारेट घेत स्टाइलमध्ये चहाचे घोट घेत-घेत झुरके मारतो. दुसरा त्याकडे काहीसा न्याहाळून पाहतो. पहिला त्याच्याकडे पेटलेली सिगारेट धरतो. दुसरा मानेनेच नाही म्हणतो. पहिला ‘ घे रे, एकच कश‌ मार तर...’. दुसरा सिगारेट घेतो आणि पहिला कश‌ मारतो... त्याला खोकला येतो, परत दुसरा कश‌ मारतो... तोंडावाटे धूर सोडतो.... तिसरा कश‌ मारतो अन्‌ नशेचा थ्रील अनुभवतो. हे चित्र नाशिकच्या अनेक ठिकणी पाहावयास मिळते. मात्र, याच नशेचा थ्रील तरुणाईला व्यसनाच्या विळख्यात घेऊन जात आहे. (thrill of intoxication Youth addicted to smoking weed ganja charas for fun nashik Latest Marathi News)

आजच्या तरुणांमध्ये चैन-स्मोकिंग करणाऱ्यांची संख्या चिंताजनक आहे. त्यातही अलीकडे महाविद्यालयीन मुलींमध्येही स्मोकिंगचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. मेट्रोसिटीमध्ये तर स्मोकिंग ही बाब सर्वसाधारण मानली जाते. मात्र स्मोकिंगच्या आहारी गेलेली तरुणाई झपाट्याने अमली पदार्थांच्या विळख्यात सापडत आहे. यात १८ वर्षांआतील तरुणाईचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. महाविद्यालयीन मुले-मुली शहरातील हॉटेल, उद्यानांमध्ये सिगारेटचे झुरके ओढताना दिसतात. परंतु, त्या सिगारेटच आहेच, याबाबत मात्र नेहमीच साशंकता व्यक्त केली जाते. नशेच्या आहारी गेलेल्यांना त्यांना हवा तो अमली पदार्थ शहरात सहज उपलब्ध होत असल्याचे बोलले जाते.

ताणतणावाचा हलकेपणा

महाविद्यालयीन तरुणांमध्ये करिअरच्या दृष्टिकोनातून अभ्यासाचा मोठा ताण असतो. याच तणावातून काही विरंगुळा वा हलकापणा वाटावा, याउद्देशाने काही तरुण नशेकडे वळतात. प्रारंभी नशा करताना प्रमाण कमी असते आणि त्यातून शारीरिक हलकेपणाही जाणवतो. याच हलकेपणातून नशेचे प्रमाण वाढण्याची सवय जडते. परिणामी मौजमजा म्हणून केलेली नशा काही दिवसांतच व्यसन होऊन बसते.

हेही वाचा : आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

हेही वाचा: Nashik News : Damage Controlसाठी संजय राऊत नाशिकच्या मैदानात; 12 माजी नगरसेवकांचा प्रवेश लांबणीवर

असा होतो परिणाम

सततची धावपळ वा ताणातून ‘रिलॅक्समूड’साठी केलेली नशा मेंदूवर परिणाम करते. कमी प्रमाणात केलेल्या अमली पदार्थांच्या नशेने मेंदूमध्ये रासायनिक बदल होतात. ‘मीडब्रेन’ (मधला मेंदू) यावर अमल पदार्थांचा थेट परिणाम होतो. नशेमुळे या मेंदूतील ‘डोपामेन’ या द्रव्याचा स्त्राव होऊन मेंदूला हलकेपणा वा फ्रेश झाल्यासारखे त्या व्यक्तीला वाटते. काही दिवस मेंदूला ते प्रमाण योग्य वाटत असले तरी कालांतराने ते प्रमाण वाढते. यामुळे मेंदूच्या संरचनेत बदल होऊन त्याचा थेट परिणाम मानसिकतेवर होतो.

नैराश्‍य, स्कायकोसिसचा धोका

अमली पदार्थाच्या आहारी जाण्याचे विपरीत परिणाम मानसिक व शारीरिक क्षमतेवर होतात. तरुणांमध्ये नैराश्‍य बळावते. त्यांना हवे तेवढ्या प्रमाणात अमली पदार्थ उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे ते अगतिक होतात. मनावर ताबा राहत नाही. नैराश्‍याच्या गर्तेत सापडत जातात. काहींना स्कायकोसिसचा धोकाही उद्‌भवतो.

हेही वाचा: Nashik News : NMCचा आर्थिक गाडा डगमगला; अंदाजपत्रकाचा ताळमेळ सादर करताना 400 कोटीची तूट

गुन्हेगारीकडे वळण

अमली पदार्थांच्या आहारी गेल्याने अशी तरुणाई गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता अधिक असते. व्यसन करणे अशा तरुणांसाठी चुकीचे नसते. त्यासाठी त्यांच्यात खोटे बोलणे, चोरी करणे यांसारख्या घटनांपासून त्यांची गैरकृत्यांची सुरवात होते. त्यातूनच काही तरुण गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांकडे वळतात. व्यसनामुळे त्याचे शैक्षणिक नुकसान होऊन करिअरही संपते. तर काही टोकाचे पाऊल उचलून स्वत:ला संपवतात.

अमली पदार्थांचे प्रकार

* ऑपीयम : १) हेरॉइन- पांढऱ्या रंगाची पावडर. २) ब्राऊन शुगर- हेरॉइनमधील भेसळयुक्त उत्तेजक अमली पदार्थ
* वीड : १) एमडी ड्रग्ज २) गांजा ३) अफिम (अफू)
* कोकेन
* स्ट्युमोलन्स (उत्तेजक अमली पदार्थ)
* शु-पॉलिश, इंक व्हाईटनर, फेव्हिकॉल, बाम

"अमली पदार्थांच्या आहारी जाऊन अनेक तरुणांचे आयुष्य उद्‍ध्वस्त झाले आहे. परंतु, योग्य समुपदेशन व औषधोपचार वेळीच झाले, तर त्यांना त्यातून बाहेरही काढता येते."
- डॉ. हेमंत सोनानीस, मानसोपचारतज्ज्ञ

हेही वाचा: Nashik Crime News : ग्रामीणमध्ये 321 अवैध धंद्यांवर कारवाई; 370 संशयितांविरोधात गुन्हे दाखल

टॅग्स :Nashiksmoking