Dhule Crime News : मंदिरात चोरी करणाऱ्या टोळीला अटक; चाळीसगाव रोड पोलिसांची कारवाई

gang who stole from temple was arrested dhule crime news
gang who stole from temple was arrested dhule crime newsesakal
Updated on

Dhule Crime News : शहरातील राजेंद्र सुरीनगर भागातील श्री पार्श्‍वनाथ भगवान व श्री नाकोडा भैरव भगवान मंदिरात चोरी करणाऱ्या टोळीला चाळीसगाव रोड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दोन लाख ८० हजारांचा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला. (gang who stole from temple was arrested dhule crime news)

२५ मेच्या रात्री नऊ ते २६ मे २०२३ सकाळी सहाच्या दरम्यान धुळे शहरातील राजेंद्र सुरीनगर भागातील श्री पार्श्वनाथ भगवान व श्री नाकोडा भैरव भगवान मंदिराचे बंद दरवाजाचे कुलूप तोडून मंदिरातील मूर्तीवरील सोन्या-चांदीचे दागिने तसेच दानपेटी फोडून मंदिरातील दागिने अज्ञातांनी चोरी केले होते.

याबाबत २६ मेस विजय तेजराज राठोड यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिस उपनिरीक्षक संदीप ठाकरे या प्रकरणाचा तपास करत आहेत. या तपासादरम्यान एक संशयित सुरत येथे असल्याचे समजल्यानंतर संशयित आसिफ शहा गफूर शहा फकीर (वय ४०, रा. नुरानी मशिदीजवळ, ८० फुटी रोड, धुळे) याला पोलिसांनी सुरत येथून तपासकामी ताब्यात घेतले व ९ जूनला अटक केली.

तपासादरम्यान त्याने त्याचा साथीदार इमरान असल्याचे सांगितल्याने पोलिसांनी इमरान शेख खालीद ऊर्फ इमरान बाचक्या (वय २३, रा. अंबिकानगर, धुळे) यास ११ जूनला अटक केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

gang who stole from temple was arrested dhule crime news
Dhule Crime News : मुलीसोबतच्या भांडणामुळे जावयास बेदम मारहाण; सासरा-मेहुण्यांना जन्मठेप

मुद्देमाल जप्त

दरम्यान, आसिफ शहा याच्याकडून एक लाख ६० हजार रुपये किमतीचे चांदीचे दोन मुकुट सेट व इमरान शेख याच्याकडून मेमोरंडम पंचनाम्यात एक लाख २० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन पट्ट्या असा एकूण दोन लाख ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याशिवाय इमरान शेख याच्याकडून मेमोरंडम पंचनाम्यादरम्यान त्याच्या राहत्या घरातून १२ गुंगीकारक औषधी बाटल्यांचा साठाही आढळून आला.

यात त्याच्यावर एनडीपीएस कायद्यांतर्गत कारवाईची तजवीज केली असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, सहाय्यक पोलिस अधीक्षक हृषीकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक धीरज महाजन, पोलिस उपनिरीक्षक संदीप ठाकरे, पोलिस उपनिरीक्षक विनोद पवार, पोलिस हेड कॉन्स्टेबल पंकज चव्हाण, रवींद्र ठाकूर, संदीप पाटील, इंद्रजित बैराट, स्वप्नील सोनवणे, पंकज शिंदे, सारंग शिंदे, देवेंद्र तायडे, शरद जाधव, चेतन झोळेकर, संदीप वाघ, सोमनाथ चौरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

gang who stole from temple was arrested dhule crime news
Karad Crime : यात्रेतलं मांसाहारी जेवण पडलं महागात; 25 जणांना विषबाधा, 'इतक्या' जणांचा मृत्यू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com