Nandurbar Crime News : शेतीसाहित्य, पिकासह दुचाकीचोरांच्या टोळ्या जेरबंद; जिल्हाभरात कारवाई

crime
crimeesakal
Updated on

Nandurbar Crime News : जिल्ह्यातील विविध भागांत शेतीसाहित्य, कापूस, ऑइलसह दुचाकी चोरी करणाऱ्या वेगवेगळ्या टोळ्या स्थानिक गुन्हे शाखा अन्वेषण विभागाने जेरबंद केल्या आहेत.

त्यातून चार गुन्ह्यांची उकल झाली असून, या टोळ्यांकडून तीन लाख ५० हजार रुपये किमतीचा आठ क्विंटल कापूस, २७० लिटर ऑइल, एक दुचाकी व सात वीजपंप हस्तगत करण्यात आल्या.(Gangs of two wheeler thieves with agricultural equipment cops jailed nandurbar crime news)

नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलिस ठाणे हद्दीत ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या शेतातून वीजपंप, इतर शेतमाल, दुचाकी चोरीच्या घटनांबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांना तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

तसेच शेतकरी बांधव स्वत:देखील भेटून व्यथा मांडत होते. त्यामुळे पोलिस अधीक्षक पाटील यांनी मासिक गुन्हे बैठकीत अशा गुन्ह्यांचा आढावा घेतला. गुन्हेगारांवर कारवाई करण्याबाबत गुन्हे बैठकीत सर्व अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

धामडोद येथील शेतातील पाण्याची मोटर चोरी करणारे भागसरी (ता.जि. नंदुरबार) येथील आहेत. चोरी केलेल्या पाण्याच्या मोटरी त्यांनी शेतांमध्ये लपवून ठेवल्याची खबर मिळाल्याने जिल्हा पोलिस अधीक्षकांनी नंदुरबार तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक नीलेश गायकवाड यांना सांगितले.

त्यांनी भागसरी गावात जाऊन रंजित अमर भिल (वय ३५), श्रीनाथ सुकलाल भिल (२६), सागर रवींद्र भिल (२२), कृष्णा प्रल्हाद भिल (२६, सर्व रा. भागसरी) यांना ताब्यात घेतले. त्यांनी धामडोद येथील शेतातून चोरी केलेल्या वीजपंपाबाबत कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून ९८ हजार रुपये किमतीच्या सात वीजपंप हस्तगत केले.

crime
Nandurbar Crime News : खोटा गुन्हा दाखल प्रकरणी पोलिसांना 21 हजारांचा दंड

तसेच शेख शकील शेख युसूफ कुरैशी यांच्या नंदुरबार तालुका पोलिस ठाणे हद्दीतील खामगाव शिवारातील शेतातील घराचे कुलूप तोडून ५६ हजार रुपये किमतीचा कापूस चोरून नेला होता. त्या प्रकरणी नीतेश प्रवीण ठाकरे (२२, रा. खामगाव) याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने ही चोरी मच्छिंद्र अनिल भिल (२२), राहुल विनोद पाडवी (सर्व रा. खामगाव) यांच्या साथीने केल्याचे सांगितेल.

त्यांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडून ५६ हजार रुपये किमतीचा आठ क्विंटल कापूस हस्तगत करण्यात आला. तलवाडे खुर्द गावाच्या शिवारातील सुझलॉन कंपनीच्या टॉवरमधून ३०० लिटर ऑइल चोरीच्या गुन्ह्यातील गोपाल कैलास राजपूत (२७, रा. तलवाडे खुर्द), मोतीलाल लक्ष्मण माळी (२२, रा. इंद्राहट्टी, ता.जि. नंदुरबार), रोहित प्रभाकर धनगर (२०, रा. तलवाडे खुर्द) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सुझलॉन टॉवरमधून चोरी केलेले २६ हजार ४६० रुपये किमतीचे २७० लिटर ऑइल जप्त करण्यात आले.

अल्पवयीनही सहभागी

शहादा येथे दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून २० हजार रुपये किमतीची दुचाकी हस्तगत करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार तालुका पोलिस ठाण्याच्या पथकाने शेतीसाहित्य, कापूस, ऑइल व दुचाकी चोरी करणाऱ्या वेगवेगळ्या गुन्ह्यांतील एकूण १० संशयित व एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेऊन त्यांच्याकडून तीन लाख ५० हजार रुपये किमतीचा सात क्विंटल कापूस, २७० लिटर ऑइल, एक दुचाकी व सात वीजपंप हस्तगत करून चार गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे, असे जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील सांगितले.

crime
Nandurbar Crime News : अवैध स्पिरिट वाहतुकीवर एलसीबीची कारवाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com