Latest Marathi News | जिल्हा रुग्णालयास कचऱ्याचा विळखा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhule: Garbage in Here Government Medical College area

Dhule News : जिल्हा रुग्णालयास कचऱ्याचा विळखा

धुळे : जिल्ह्यातील गरीब, गरजू रुग्णांची चक्करबर्डीतील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जिल्हा सर्वोपचार रुग्णालयावर भिस्त असते.

मात्र, या परिसराला कचराकुंडीचे स्वरूप प्राप्त झाल्याचे वास्तव शुक्रवारी (ता. ६) जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या नजरेस पडले. संघाच्या प्रतिनिधींनी संबंधित परिसरास भेट दिली असता नाक मुठीत घेऊन पाहणी करावी लागली. (Garbage Stock in district hospital Dhule News)

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

हेही वाचा: Nashik News : नाशिकच्या स्वच्छ हवेत होणार सुधारणा; वित्त आयोगाकडून २२ कोटी

महाविद्यालयाच्या रुग्णालय परिसरात मोकाट कुत्री, वराहंचा मुक्तसंचार दिसून आला. जैविक कचऱ्याची उघड्यावर विल्हेवाट केली जात असल्याचे निदर्शनास आली. रस्त्याची दुरवस्था आहे. वॉर्डांमध्ये ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य दिसून आले.

बहुतांश वॉर्ड अस्वच्छ होते. रुग्णांसोबत नातेवाइकांना नाका-तोंडाला रुमाल लावल्याशिवाय वावरता येत नाही.

येत्या आठवड्यात हा कारभार न सुधारल्यास प्रशासनाला जाब विचारू, असा इशारा संघाचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर पाटील, मिलिंद बैसाणे, रवींद्र इंगळे, अध्यक्ष विशाल ठाकूर, उपाध्यक्ष मनोज गर्दे, कोशाध्यक्ष अतुल पाटील, तुषार बाफना, सचिन बागूल यांनी दिला. पत्रकार दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमानंतर आणि रुग्ण नातेवाइकांच्या माहितीनंतर या प्रतिनिधींनी पाहणी केली.

हेही वाचा: SAKAL Impact News : उद्यान स्वच्छता मोहीमेस सुरवात; कालिका उद्यानातील खेळण्यांचीही लवकरच होणार दुरुस्ती