कापडणे- खानदेशात उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. भाजीपाल्याचे दरही वाढत आहेत. सध्या मोठ्या प्रमाणात गवारची काढणी सुरू आहे. मागणीही अधिक आहे. गवार प्रतिकिलो सत्तरपेक्षा अधिक भावाने विक्री होत आहे. शेतकऱ्यांना मालामाल करणारी गवार चांगलीच भाव खातेय. राज्यातील प्रत्येक बाजार समितीत गवार प्रतिकिलो साठच्या पुढेच आहे.