Girna River
sakal
उत्तर महाराष्ट्र
Girna River : गिरणा नदी दुथडी भरून वाहतेय: जामदा बंधाऱ्यातून ३६०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू
Heavy Rainfall and Water Discharge Impact Girana Region : चाळीसगाव तालुक्यात या वर्षी दमदार पावसामुळे छोटे-मोठे नाले व बंधारे ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचे चित्र सध्या गिरणा परिसरात दिसून येत आहे.
मेहुणबारे (ता. चाळीसगाव): गिरणा परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे गिरणा नदीवरील जामदा (ता. चाळीसगाव) येथील बंधाऱ्यावरून सुमारे तीन हजार सहाशे क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे. जामदा डावा कालवातून म्हसवा व भोकरबारी मध्यम प्रकल्पाच्या पुनर्भरणासाठी २५० क्यूसेकने विसर्ग जात आहे. चाळीसगाव तालुक्यात या वर्षी दमदार पावसामुळे छोटे-मोठे नाले व बंधारे ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचे चित्र सध्या गिरणा परिसरात दिसून येत आहे.