esakal | VIDEO : भाजपकडून कुणाला धमकवण्यात आलं,याचा पुरावा संजय राऊतांनी द्यावा - गिरीश महाजन
sakal

बोलून बातमी शोधा

gm.png

भाजपकडून कुणाला धमकवण्यात आलं, कुठे गुंडांचा वापर झाला, दबाव टाकण्यात आला, याचा एखादा तरी पुरावा संजय राऊतांनी द्यावा, असे सांगत राज्याचे जलसंपदामंत्री व भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना आव्हान केले आहे. तसेच त्यांच्या पक्षाने त्यांना बोलण्याचा अधिकार दिलाय, म्हणून ते बोलतायत, मात्र युतीत तणाव निर्माण होईल, अशी वक्तव्य राऊतांनी करू नये.

VIDEO : भाजपकडून कुणाला धमकवण्यात आलं,याचा पुरावा संजय राऊतांनी द्यावा - गिरीश महाजन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : भाजपकडून कुणाला धमकवण्यात आलं, कुठे गुंडांचा वापर झाला, दबाव टाकण्यात आला, याचा एखादा तरी पुरावा संजय राऊतांनी द्यावा, असे सांगत राज्याचे जलसंपदामंत्री व भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना आव्हान केले आहे. तसेच त्यांच्या पक्षाने त्यांना बोलण्याचा अधिकार दिलाय, म्हणून ते बोलतायत, मात्र युतीत तणाव निर्माण होईल, अशी वक्तव्य राऊतांनी करू नये. आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत, पक्षाने आम्हाला बोलण्याचा अधिकार दिलेला नाही. असे देखील महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

VIDEO : शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे गिरीश महाजन..पाहा

दरम्यान आज (ता.३) राज्याचे जलसंपदामंत्री व भाजपचे नेते गिरीश महाजन हे नाशिकच्या दौ-यावर असून अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी यावेळी करत आहेत.सर्वत्र कहर माजविलेल्या अवकाळी पावसाने शेतीला तडाखा दिला असून, शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिसकावला आहे. आधी पावसाअभावी आणि आता पावसामुळे उत्पन्नात तब्बल नुकसान होत आहे.अल्प पावसाअभावी दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या येथील शेतकऱ्यांचा आर्थिक कणा खिळखिळा झाला आहे. अशात सुरवातीला खरीप हंगाम रिमझिम पावसावर सुरू केला पण मध्यंतरी पावसाने कृपा केल्याने या वेळी मका, सोयाबीन, कपाशी व कांदा जोमात आल्याने यंदा आबादानी होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना होती. गेल्या दोन महिन्यांत वेळोवेळी पाऊस व पालखेड डाव्या कालव्याचे आवर्तनही दोन महिने चालल्याने सर्वत्र पाणीच पाणी होऊन खरिपासोबत रब्बीचा आशावाद जागा झाला असताना नियतीने बळीराजाच्या या स्वप्नांचा चक्काचूर केला आहे. शेतातील नासाडी झालेल्या पिकाकडे पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी तरळत आहे. 

जरुर वाचा...

VIDEO : सेनेसोबतच्या वाटाघाटीतून तोडगा निघेल..सत्तास्थापनेसंदर्भात पाहा काय म्हणाले गिरीश महाजन​