Khadse Vs Mahajan
sakal
जळगाव: पुण्यातील कोरेगाव पार्क येथील कोट्यवधींच्या जमीन व्यवहारात पार्थ पवारांवर आरोप होत आहेत. भोसरी येथील जमीन व्यवहारात माजी मंत्री एकनाथ खडसेंना राजीनामा द्यावा लागला, त्याच धर्तीवर पवारांनीही राजीनामा दिला पाहिजे, असे मत खडसेंनी व्यक्त केले. या वादात मंत्री गिरीश महाजनांनी उडी घेत खडसेंना डिवचले असून दोघांमध्ये पुन्हा शाब्दिक चकमक झडली आहे.