Latest Marathi News | चाकूचा धाक दाखवीत युवतीवर अत्याचार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

assault

Dhule Crime : चाकूचा धाक दाखवीत युवतीवर अत्याचार

शिरपूर : झोपेत असलेल्या १४ वर्षीय युवतीस उचलून नेल्यानंतर चाकूचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना टेकवाडे (ता.शिरपूर) येथे घडली. संशयित तरुणाने पीडितेच्या भावांवरही चाकूने वार करून पळ काढला. पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार, २८ सप्टेंबरला पहाटे तीनला ती आईसोबत घराबाहेर पत्र्याच्या शेडमध्ये झोपली होती.(girl was assaulted by threatening her with knife dhule latest crime news)

हेही वाचा: Nashik Crime News : वाके येथे गावठी दारु, रसायन जप्त; 2 महिला ताब्यात

तिच्या घराशेजारी राहणाऱ्या संशयित राकेश संजय कोळी याने तिचे तोंड दाबून उचलून स्वतःच्या घरी नेले. तिच्या गळ्याला चाकू लावून त्याने अत्याचार केला. तासाभरानंतर तो पुन्हा अत्याचाराच्या प्रयत्नात असताना मुलीने त्याला ढकलून घराकडे पळ काढला.

तिची आरडाओरड ऐकून आई, भाऊ यांना जाग आली. संशयित राकेश तिच्यामागे चाकू घेऊन धावत आला. तिचा भाऊ बादल व चुलतभाऊ सचिन भिल याने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. राकेशने दोघांवर चाकूने वार करून पळ काढला. शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा: Rain Crop Damage News : मक्याचे उत्पादन घटणार; अतिपावसामुळे नुकसान