गिरड (ता. भडगाव): येथील पाचोरा- गिरड रस्त्यावरील गिरणा नदीवर असलेला पूल प्रवाशांसाठी धोकेदायक बनला आहे. या पुलाला सुमारे ४० वर्षांहून अधिक वर्षे झाली आहेत. सध्या पुलाला संरक्षणाच्या दृष्टीने कठडे नसल्यामुळे अनेकदा लहान-मोठा अपघात घडले आहेत. पुलाची उंची वाढवण्यासह दुरुस्तीची मागणी करूनही लोकप्रतिनिधींसह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी लक्षच देत नसल्याने ग्रामस्थांनी आंदोलनाचा मार्ग पत्करण्याचा इशारा दिला आहे.