"ग्लोबल क्‍लायमेट चेंज'ला जळगावातूनही "स्ट्राईक' 

rali atend studant
rali atend studant

जळगाव : स्वीडनच्या 19 वर्षीय ग्रेटा थनबर्ग हिने सध्या जगभरात पर्यावरण संवर्धनाची मोहीम उघडली असून, "झिरो अवर' या संस्थेच्या माध्यमातून "ग्लोबल क्‍लायमेट स्ट्राईक' चळवळीची भारतातही रुजवात झालीय.. जळगावही त्यात मागे नाही. म्हणूनच, जगात गंभीर बनलेल्या "ग्लोबल क्‍लायमेट चेंज'ला जळगाव जिल्ह्यातून "स्ट्राईक' देण्याचे प्रयत्न सुरू झालेत. 
जगात ग्रेटाने सुरू केलेली चळवळ परिवर्तनाची नांदी ठरणार आहे. या चळवळीत जळगाव जिल्हाही मागे राहिलेला नाही. जिल्ह्यातील गिरीश पाटील याने या चळवळीचा भारतातील मोर्चा सांभाळला आहे. विशेषत: या चळवळीचा भाग म्हणून "फ्रायडे फॉर फ्युचर' संकल्पना राबवली जात असून, या संकल्पनेचे भारतातील नेतृत्व जळगाव जिल्ह्यातील गिरीश पाटीलसह दिल्लीच्या स्मृती लोहिया, नयना अग्रवाल हे युवक करताहेत. 

गिरीशचे चळवळीत सामील होणे.. 
गावात लहानपणापासून पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो, हे सर्व अतिशय दुर्दैवी वाटत होते. शेतीत पीक घेताना शेतकरी कुठलाही विचार करत नाही. पारंपरिक पिकांच्या पलीकडे जाण्याचा सकारात्मक विचार करत नाही, ही खेदाची बाब आहे. यात बदल घडवण्यासाठी युवकांना संघटित करण्याचे कार्य गिरीशने आपल्या हाती घेतले. पर्यावरणतज्ज्ञ अरविंद गुप्ता, सुंदरलाल बहुगुणा, राजेंद्र सिंग यांच्या आदर्शाची शिदोरी सोबत आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांत पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी गिरीश प्रयत्नशील असून, त्याने तसा संकल्पही केलांय.. 

पर्यावरण निवडणुकीचा मुद्दा बनावा 
सरकार व नागरिक जोपर्यंत एकत्र येणार नाही, तोपर्यंत चळवळींना अर्थ राहणार नाही. पर्यावरण हा निवडणूक प्रचारातील मुद्दा बनायला हवा, त्याशिवाय राजकीय पक्ष या चळवळीला गांभीर्याने घेणार नाहीत. दिग्विजय सिंह यांचा राजकारणातील उदय हा पर्यावरणातून झालेला आहे. आंदोलन- मोर्चांपलीकडे जात आता निर्णय घेण्याची वेळ आलीय.. 

पर्यावरण चळवळ ही डाव्यांची असल्याचा गैरसमज आहे. त्यातून चळवळीकडे दुर्लक्ष होते, हे दुर्दैवी आहे. हा प्रश्‍न जागतिक आणीबाणीचा आहे. भांडवलशाही देश मोठ्या प्रमाणात प्रदूषण करतात, त्याचे परिणाम जगाला भोगावे लागतात. भारतीय आदिवासी खऱ्या अर्थाने पर्यावरणाचा संवर्धक आहे कारण ते झाडाला देव मानतात. हे जगासमोर मांडायची वेळ आली आहे. 
- गिरीश पाटील (राष्ट्रीय प्रतिनिधी, झिरो अवर संस्था) 

गिरीशची सर्वसमावेशक झेप 
गिरीश "झिरो अवर' संस्थेचा राष्ट्रीय सदस्य आहे. पर्यावरण संवर्धनाबाबत त्याचे केरळच्या विधानसभेत भाषण झाले असून नवनीत प्रकाशनाच्या "यंग स्टुडंट कौन्सिल'चाही तो सदस्य आहे. देशभरातील पर्यावरण संवर्धन चळवळीत विविध ठिकाणच्या कार्यक्रमांना त्याने हजेरी लावली असून, साहित्याची आवड असल्याने बाल साहित्य संमेलनांचे अध्यक्षपदही त्याने भूषविले आहे. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com