धुळे- बकरी ईद काळात जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच कुठेही गोहत्या होऊ नये, यासाठी पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या नेतृत्वात जिल्हा पोलिस दलाने ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राबवित २३ प्रकारच्या उपाययोजना केल्या. त्यामुळे यंदाची ईद शांततेत आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली. यावर्षी आतापर्यंत जिल्ह्यात गोवंश तस्करी व हत्येप्रकरणी ७२ गुन्हे दाखल झाले. यात ११५ संशयितांना अटक करण्यात आली. शिवाय, अनेकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करत काहींना तडीपार, तर काहींना शहरात प्रवेशबंदी करण्यात आली.