धुळे- हिंदू संस्कृतीमधील साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या गुढीपाडवा (ता. ३०) सण दोन दिवसांवर आहे. या पार्श्वभूमीवर सोने-चांदीचे दर उच्च पातळीवर पोहोचले आहेत. त्यामुळे सोन्याला खऱ्या अर्थाने दर आल्याने ग्राहकांना मोठा आर्थिक भार सहन करावा लागणार आहे. सोने आणि चांदी दरात सातत्याने वाढ सुरूच आहे. गत दोन महिन्यांत सोने तब्बल दहा हजारांनी वधारले आहे, तर चांदी लाखाच्या पार गेली आहे. सोने व चांदीचे सार्वकालिक उच्चांकी नोंदविण्यात आले आहे.