सोन्याची वाटचाल तेजीकडे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मे 2019

सातशे रुपयांची वाढ
डॉलरचे दर वाढल्याने सोन्याच्या दरातही गेल्या आठ-दहा दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. यात सोन्याचे दर सात मे रोजी दहा ग्रॅमला ३२ हजार १०० इतके होते. सराफ बाजारात हेच दर आज (ता.१७) ३२ हजार ८०० रुपयांवर आले आहेत, तर चांदीचे दर दहा किलोला ३८ हजार ५०० रुपयांवरून ३९ हजारांवर पोचले आहेत. मात्र, गेल्या दहा दिवसांपासून चांदीचे दर ३९ हजारांवर स्थिर आहेत.

जळगाव - लग्नसराईचे दिवस सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात दागिन्यांची खरेदी केली जाते; परंतु आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलरच्या दरात वाढ झाल्याने सोने-चांदीच्या दरात चढउतार होत आहेत. या दरवाढीमुळे सोन्याचे तेजीकडे वाटचाल करत आहे, तर चांदीचे दर ३९ हजारांवर स्थिरावले आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरचे भाव वधारल्याने गेल्या आठवड्यापासून सोन्याच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे जळगावात आज सोन्याचा भाव दहा ग्रॅमला ३२ हजार ८०० रुपये व चांदी किलोप्रमाणे ३९ हजार रुपये होता. गेल्या आठवड्यापासून सोन्याच्या दरात दररोज चढउतार होऊन ५० ते १०० रुपयांची वाढ होत गेली. लग्नसराई असल्याने खरेदी वाढल्यानेही दरात चढ उतार होत असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील डॉलरच्या किमतीतील बदलाचे मुख्य कारण आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलरचे भाव वाढत असल्याने सोने-चांदीच्या भावात वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दर स्थिर होईपर्यंत हा बदल होत राहील.
- सुनील बाफना, बाफना ज्वेलर्स


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gold Rate Increase