जळगाव- सोन्याच्या भावाला प्रतिदहा ग्रॅमला लाखाची झळाळी आहे. याचा विपरीत परिणाम सोन्यात गुंतवणूक करणारे ग्राहक, हौशी दागिने घेणाऱ्यांवर झाला आहे. सध्या केवळ ज्यांच्या घरी लग्न आहे, तेच सोने, चांदी घेत आहेत. सोन्या-चांदीच्या भावात वाढ झाल्याने गुंतवणूकदार भाव कमी होण्याची वाट पाहत आहेत. एकंदरीत ३० ते ३५ टक्के घट सोने विक्रीत झाल्याची माहिती सुवर्ण व्यावसायिकांनी दिली.