साहित्य-संस्कृतीच्या धनापुढे टाटा, बिर्ला, अदानी फिके..! 

निखील सुर्यवंशी
Friday, 5 February 2021

विद्वत्तेमुळे विद्वानाला सर्वत्र मानाचे स्थान असते. अलेक्झांडरसारख्या सम्राटालाही विद्वत्तेसमोर झुकावे लागले होते.

धुळे ः साहित्य- संस्कृतीरूपी शाश्‍वत धनसंपत्ती सदैव अमर असते. त्यापुढे टाटा, बिर्ला, अदानी काहीच नाही, असे सांगत समर्थ रामदास स्वामींचे साहित्य समाजापर्यंत पोहोचविण्याऱ्या समर्थ वाग्देवता मंदिराच्या कार्यासाठी राज्यपाल निधीतून पाच लाखांचा निधी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी जाहीर केला. 

आवश्य वाचा- जळगाव वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय केंद्र सरकारच्या कार्यक्षमता चाचणीत सर्वोत्तम 

 

येथील मालेगाव रोडवरील समर्थ वाग्देवता मंदिराच्या येथील नानासाहेब देव सभागृहात संत रामदास स्वामी लिखित ‘वाल्मिकी रामायण- ‘किष्किंधाकाण्डम्‘ या ग्रंथाचे राज्यपाल कोश्‍यारी यांच्या हस्ते प्रकाशन झाले. खासदार डॉ. सुभाष भामरे, समर्थ मंदिराचे अध्यक्ष शरद कुबेर, सज्जनगडावरील समर्थ वंशज भूषण स्वामी प्रमुख पाहुणे होते. 

प्रभूराम संस्कृतीचे प्रतीक 
राज्यपाल कोश्यारी म्हणाले, की विद्वत्तेमुळे विद्वानाला सर्वत्र मानाचे स्थान असते. अलेक्झांडरसारख्या सम्राटालाही विद्वत्तेसमोर झुकावे लागले होते. विद्वान, संत- महाम्यांचा भारत देश आहे. जग पुन्हा एकदा प्राचीन भारतीय साहित्याकडे वळताना दिसत आहे. अशा वेळी समर्थ वाग्देवता मंदिरातर्फे घेण्यात आलेले प्रकल्प समाजासाठी उपयुक्त ठरतील. जगातील विविध देशात रामायण पोहोचले आहे. रामायणाच्या माध्यमातून मानव जीवनाला आदर्श असणारे भारतीय संस्कृतीचे मूल्ये प्रकट होतात. संस्कृतीचे प्रतीक प्रभू रामचंद्राचे समुद्रासारखे गांर्भिर्य आणि हिमालयासारखे र्धेर्य सर्वांसाठी आदर्श आहे. त्यांच्या जीवनातील मूल्ये देशाला जोडण्याचे कार्य करतात. 

 

संशोधन केंद्रासाठी प्रयत्न 
श्री. डोंगरे यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. रामायणाच्या आंतरराष्ट्रीय संशोधनाचे केंद्र उभारण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. तत्पूर्वी, राज्यपाल कोश्यारी यांनी समर्थ वाग्देवता मंदिराला भेट देऊन दुर्मीळ साहित्य व हस्तलिखिताविषयी माहिती घेतली. त्यांनी समर्थ वाग्देवता मंदिराच्या कार्याबद्दल कौतुकोद्गार काढले. अपर्णा बेडेकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. अरविंद महाजनी यांनी आभार मानले.

 
राजभवनाचे प्रधान सचिव संतोष कुमार, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर, उपसचिव श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी संजय यादव, पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी., उत्तर महाराष्ट्राचे कुलगुरू डॉ. पी. पी. पाटील, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, मंदिराचे कार्याध्यक्ष देवेंद्र डोंगरे, सत्कार्योत्तेजक सभेचे अध्यक्ष प्रा. विश्‍वास नकाणेकर, विचारवंत प्रकाश पाठक, वास्तुतज्ज्ञ रवी बेलपाठक, डिजिटल स्कूलचे प्रणेते हर्शल विभांडिक, डॉ. महेश घुगरी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता वर्षा घुगरी आदी उपस्थित होते. 

आवर्जून वाचा- तरसोद-चिखली टप्प्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वेगात  ​

 

राज्यपालांच्या हस्ते यांचा सत्कार... 
राज्यपाल कोश्‍यारी यांच्या हस्ते रामायण संशोधन प्रकल्पात योगदान देणारे न्या. अंबादास जोशी, डॉ. अरुंधती जोशी (पुणे), डॉ. रुपाली कपडे (संगमनेर), डॉ. शोभा शिंदे (धुळे), चित्रकार वासुदेव कामत (मुंबई), बाळू बुवा रामदासी, हर्षवर्धन कुळकर्णी (सातारा), डॉ. निलेश जोशी- वैशंपायन (बनारस विद्यापीठ) सत्कार झाला. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Governor marathi news dhule valmiki ramayana kishkindhakandam granth publication governor bhagatsing koshyari