Graduate Constituency Election : ‘पदवीधर’ साठी आज मतदान; जिल्ह्यात 29 मतदान केंद्रांची व्यवस्था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Election News

Graduate Constituency Election : ‘पदवीधर’ साठी आज मतदान; जिल्ह्यात 29 मतदान केंद्रांची व्यवस्था

धुळे : नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघासाठी सोमवारी (ता. ३०) मतदान होईल. यासाठी धुळे जिल्ह्यात २९ मतदार केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. या निवडणुकीची मतमोजणी २ फेब्रुवारीला होईल.

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात सहा, शिंदखेडा तीन, साक्रीत पाच, तर धुळे तालुक्यात १५ अशी एकूण २९ मतदान केंद्रे आहेत. निवडणुकीसाठी एकूण दोन लाख ६२ हजार ७३१ मतदार पात्र आहेत. (Graduate Constituency Election Voting today for Graduates Arrangement of 29 polling stations in district Dhule News)

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

त्यांच्यासाठी विभागात ३३८ मतदान केंद्रांची सोय करण्यात आली आहे. त्यात अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक १४७, नाशिक- ९९, जळगाव- ४०, धुळे- २९ व नंदुरबार जिल्ह्यात २३ मतदान केंद्रे आहेत. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ऑक्टोबर- २०२२ पासून मतदार नावनोंदणी मोहीम राबविली गेली.

त्यात २ जानेवारीपर्यंत नावनोंदणी करणाऱ्या मतदारांचा मतदारयादीत समावेश झाला आहे. त्यात अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक एक लाख १५ हजार ६३८, नाशिक- ६९ हजार ६५२, जळगाव- ३५ हजार ५८, धुळे- २५ हजार ४१२ व नंदुरबार जिल्ह्यात १८ हजार ९७१ मतदार आहेत.