esakal | संचारबंदी, ग्रामपंचातीच्या निवडणूकांमूळे 31 डिसेंबरच्या पार्ट्या ग्रामीण भागात रंगणार
sakal

बोलून बातमी शोधा

gram panchayat election

यंदा 31 डिसेंबरचा पार्टीचा भार उमेदवारांवर पडेल असे दिसते. येथे तशी चर्चा व नियोजनही सुरू झाले आहे.

संचारबंदी, ग्रामपंचातीच्या निवडणूकांमूळे 31 डिसेंबरच्या पार्ट्या ग्रामीण भागात रंगणार

sakal_logo
By
एल.बी.चौधरी

सोनगीर : जिल्ह्यात 218 गावात ग्रामपंचायत निवडणूक असल्याने ग्रामीण भागात मावळत्या वर्षाला निरोप देताना यंदा अधिकच रंग भरणार असून उमेदवारांना आर्थिक झळ सोसावी लागेल असे दिसते. 
 

आवर्जून वाचा-  बापरे! घरातून एक सदस्य एकदा तरी सरपंच व्हावा म्हणून लावली ४२ लाखांची बोली; गावाची सर्वत्र चर्चा -
 

कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या शक्यतेने रात्रीची संचारबंदी जाहीर झाली असली तरी रात्री अकरापर्यंतका असेना नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी युवा वर्गात जय्यत तयारी सुरू असून उत्साहाचे वातावरण आहे. येथील ढाबेचालकही 31डिसेंबरसाठी सज्ज झाले आहेत. ग्रामपंचायत निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणे सुरू झाले आहे. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत मावळत्या वर्षाला निरोप दिला जाणार अधिकच रंगत वाढणार आहे. येथे ढाब्यांच्या  संख्येतही वाढ झाली असून स्पर्धा वाढली आहे. दरम्यान पोलिसांनी व दारूबंदी विभागाने नकली दारूचा सुळसुळाट थांबविण्यासाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे.

शेतात रंगणार पार्ट्या

नवीन वर्षाचे स्वाेगत व सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी तरुणाई सज्ज झाली आहे. निवडणूक मग ती कोणतीही असो मतदारांची खाण्यापिण्याची चंगळ व्हावी म्हणून गरीब बिचार्‍या बोकडाचा बळी जातो. युवकांच्या गटांनी शेतात, काहींनी मित्रांच्या रिकाम्या घरात, काहींनी शहरातील हॉटेलांनी आयोजित केल्या आहे.

आवश्य वाचा- मनसेने दिला इशारा..अधिकाऱ्यांचे श्राद्ध घालण्याची तयारी
 

उमेदवारांवर खर्चाचा भार 

कार्यक्रमात तर काहींनी ढाब्यावर पार्टीचे आयोजन केले आहे. कडक थंडी असली तरी उत्साह कमी झालेला नाही. सरते वर्ष व सामिष भोजन यांचे एक समीकरणच असते. यंदा 31 डिसेंबरचा पार्टीचा भार उमेदवारांवर पडेल असे दिसते. येथे तशी चर्चा व नियोजनही सुरू झाले आहे. मांसाहारी जेवण बनविणारे अनेक आचारी असून विशेषत: मुस्लीम आचारींना मागणी अधिक असते. 

ढाबे सज्ज
मुंबई आग्रा महामार्गलगत परिसरात ढाब्यांची संख्या गेल्या दोन वर्षात दुप्पट झाली आहे. सोनगीर अंकलेश्वर राज्यमार्गावरील वाहतूक वाढल्याने परिसरात त्यामार्गावर ढाब्यांची संख्या वाढत आहे. गावरानी भाकरी व ठेचासह शाकाहारी,मांसाहारी जेवणात अनेक प्रकार उपलब्ध आहेत.  ढाबेचालकांनी साफसफाई, रंगरंगोटी, नवीन आसन व्यवस्था, विद्यूत रोषणाई आदि तयारी केली आहे.

वाच- धुळे महापालिकेला स्कॉच ॲवॉर्ड; भुयारी गटार स्वच्छतेसाठी रोबोटिक मशिनचा वापर -

नकली दारू पासून सावधान
दरम्यान 31 डिसेंबर निमित्त जिल्ह्यात मध्यप्रदेशातून नकली दारूचा पुरवठा होतो. असली दारूचा अंमल चढल्यावर ग्राहकांना पुढे नकली दारू दिली जाते. ती दारू स्पिरीट व रसायन मिश्रीत असून आरोग्याला हानीकारक असते. म्हणून अधिक पिणे धोकादायक ठरू शकते. सरत्या वर्षाला निरोपाचा पुरेपुर आनंद घेतांना सावधानता पाळावी तसेच पोलिसांनी व दारूबंदी विभागाने नकली दारू विक्रेत्यांवर कारवाई करावी अशी मागणी आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image